भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात ‘आत्मनिर्भर भारत’

Homeताज्या बातम्यादेश

भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात ‘आत्मनिर्भर भारत’

नवी दिल्ली : भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यासाठी महाराष्ट्र दालन सज्ज झाले आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या मेळ्यात देशात

पत्र पत्र खेळणाऱ्या शासनामुळे MPSC करणाऱ्या तरुणाची आत्महत्या
भूमिगत कालव्याचा प्रस्ताव पुन्हा बारगळणार
एसटी कर्मचार्‍यांचा आक्रमक पवित्रा

नवी दिल्ली : भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यासाठी महाराष्ट्र दालन सज्ज झाले आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या मेळ्यात देशातील सर्व राज्ये आपापल्या राज्याच्या प्रगतीचे दर्शन घडवित आहेत. महाराष्ट्राने यंदा राज्यातील औद्योगिक वाटचालीचा आलेख ‘आत्मनिर्भर’ संकल्पनेखाली साकारला आहे. या मेळ्यातील महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते रविवारी दि. 14 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.30 वा. होणार आहे. 14 ते 27 नोव्हेंबर 2021 या कालावधीत प्रगती मैदान येथे 40 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीच्या मेळ्याची मध्यवर्ती संकल्पना ‘आत्मनिर्भर भारत’ ही आहे. या मेळ्यात महाराष्ट्राने आपल्या प्रगतीचे दर्शन घडविणारे सुरेख प्रदर्शन औद्योगिक वाटचालीतील महाराष्ट्राचा विकास या संकल्पनेतून साकारले आहे.
‘आत्मनिर्भर’ ही संकल्पना मांडताना यंदा उद्योग क्षेत्रातील महाराष्ट्राची भरारी तसेच डिजिटल, ई-तंत्रज्ञान क्षेत्रातील विकास, निर्यात, लघुउद्योग, स्टॉर्टअपला चालना देणारे धोरण, आदी सर्वच विषयांना स्पर्श करणारे आकर्षक प्रदर्शन यंदा महाराष्ट्राने आयोजित केले आहे. यामध्ये महाराष्ट्र शासनाचे तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाअंतर्गत येणारे 13 स्टॉल्स असणार आहेत. बचत गटांचे 8 स्टॉल्स , कारागीरांचे 7 स्टॉल्स , सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगातंर्गत येणारे उद्योग समुह (क्लस्टर) चे 8 स्टॉल्स आणि स्टॉर्टअप चे 6 स्टॉल्स यंदा असणार आहेत. प्रगती मैदान येथील गेट क्रमांक 5 बी, मधील नवीन बांधकाम इमारतीमधील 2 क्रमांक इमारतीतील दुस-या मजल्यावर महाराष्ट्र दालन आहे. या महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन रविेवारी दि. 14 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 3.30 वाजता राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याहस्ते होणार आहे. या उद्घाटन प्रसंगी उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण दराडे, अपर मुख्य सचिव तथा महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त श्यामलाल गोयल आदी उपस्थित राहतील. यावर्षी भागीदारी राज्य बिहार असून फोकस राज्य झारखंड आहे.

COMMENTS