भारतात ‘गझवा-ए-हिंद’ करण्यासाठी हिंदूंच्या धर्मांतराचे जागतिक षड् यंत्र

Homeताज्या बातम्यादेश

भारतात ‘गझवा-ए-हिंद’ करण्यासाठी हिंदूंच्या धर्मांतराचे जागतिक षड् यंत्र

प्रतिनिधी : मुंबई भारतातील कट्टर मुसलमान देशाची नोकरशाही स्वत:च्या नियंत्रणात घेण्यासाठी 'यु.पी.एस्.सी. जिहाद' म्हणजेच 'नोकरशाही जिहाद' चालवत आहेत

राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या जिल्हा सचिवपदी नितीन खंडागळे
आंतरराज्य बनावट औषध खरेदी व विक्री करणाऱ्यांवर कारवाई
मरीन ड्राईव्ह ते हाजी अली उत्तर वाहिनी खुली

प्रतिनिधी : मुंबई

भारतातील कट्टर मुसलमान देशाची नोकरशाही स्वत:च्या नियंत्रणात घेण्यासाठी ‘यु.पी.एस्.सी. जिहाद’ म्हणजेच ‘नोकरशाही जिहाद’ चालवत आहेत. भारताच्या ‘यु.पी.एस्.सी.’ परिक्षेत ‘जकात फाउंडेशन’ या संस्थेचे मुसलमान विद्यार्थी भारतातून मोठ्या प्रमाणात उत्तीर्ण होत आहेत. यासाठी संघटनांना अनेक आतंकवादी संघटनांकडून अर्थपुरवठा होत आहे. ‘जकात फाउंडेशन’च्या ‘शरीयत परिषदे’चा वरिष्ठ सल्लागार मौलाना कलीम सिद्दीकी याला धर्मांतरासह आर्थिक हेराफेरीच्या प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांनी नुकतीच अटक केली. सिद्दीकी हा फक्त एक प्यादा असून यामागे भारतात ‘गझवा-ए-हिंद’ करण्यासाठी हिंदूंच्या धर्मांतरणाचे जागतिक  षड् यंत्र   चालू आहे, असे रोखठोक प्रतिपादन ‘सुदर्शन न्यूज’चे मुख्य संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘भारतात धर्मांतर जिहाद !’ या विषयावर आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.

    धर्मांतरविषयीचे वास्तव मांडताना श्री. चव्हाणके पुढे म्हणाले की, सरकारने या प्रकरणात काही जणांना जरी अटक केली असली, तरी हा ‘जिहाद’ अनेक मौलाना राबवत आहेत आणि अजूनही ते मोकाट फिरत आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल किंवा विकलांग व्यक्ती, दूरवस्तीत राहणारे हिंदू यांना प्रथम लक्ष्य करून त्यांना धर्मांतरीत केले जात आहे. गेल्या 15 महिन्यांत केवळ बिहारमध्येच 10 लाख हिंदूंचे धर्मांतर झाले असून ते आता ख्रिस्ती बनले आहेत. भारतात अन्य राज्यांतही मोठ्या प्रमाणात धर्मांतरे होत आहेत.

     ‘प्रयागराग टाइम्स्’चे संपादक श्री. अनुपम मिश्रा या वेळी म्हणाले की, हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी मुसलमान आणि ख्रिस्ती यांना देशात मोकळीक देण्यात आली आहे. भारतात असे कोणते राज्य आहे का, जिथे मदरशांना आर्थिक साहाय्य आणि इमामांना वेतन दिले जात नाही ? ‘जमात-ए-इस्लामी’सारख्या संघटना आपल्या संकेतस्थळावर जाहीर करतात की, ‘धर्मांतर करणे हा आमच्या अस्तित्वाचा मुख्य उद्देश आहे.’ विविध ठिकाणी सरकारकडून हिंदूंचे दमन होत असताना धर्मांतर करणारे मिशनरी, तसेच सार्वजनिक ठिकाणी नमाज पडणारे कट्टरतावादी यांना हिंदू आता संघटीतपणे विरोध करत आहेत, हा एक आशेचा किरण आहे.

      हिंदु जनजागृती समितीचे उत्तर प्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी म्हणाले की, आतापर्यंत मोठ्या संख्येने झालेले हिंदूंचे धर्मांतर आमिष दाखवून किंवा बळजबरीने झाले आहे. ‘धर्मांतर हे राष्ट्रांतर’ आहे. धर्म आणि संस्कृती नष्ट करून आतापर्यंत मोगलांसह अन्य परकीय आक्रमकांनी कसे आपल्या देशाचे विभाजन केले, हा खरा इतिहास सांगून हिंदूंमध्ये जनजागृती केली पाहिजे. हिंदू बांधवांना आपल्या हिंदु धर्माची महानता समजावून सांगण्याची आवश्यकता आहे. देशात ‘धर्मांतरविरोधी कायदा’ आणून त्याची कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. हिंदूंनी स्वत: धर्मपालन केले, तर आपल्या धर्माविषयी अभिमान निर्माण होईल.

COMMENTS