भातोडी लढाईचा प्रेरणादायी इतिहास घराघरांतून पोहोचावा ; शरीफजीराजे स्मृतिदिनी विविध पुरस्कारांचे वितरण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भातोडी लढाईचा प्रेरणादायी इतिहास घराघरांतून पोहोचावा ; शरीफजीराजे स्मृतिदिनी विविध पुरस्कारांचे वितरण

अहमदनगर/प्रतिनिधी- वीर शरीफजीराजे भोसले यांच्या 397व्या स्मृतिदिनी भातोडी येथील त्यांच्या समाधीस उत्तुंग भरारी प्रतिष्ठानच्यावतीने अभिवादन करण्यात आ

तुळजाभवानी मातेच्या कमानीमुळे राहुरीच्या वैभवात भर
चोर समजून मारहाण, परप्रांतीय तरुणाचा मृत्यू
विवाहितेचा छळ करून खून, नातेवाईकांचा ठिय्या | LOKNews24

अहमदनगर/प्रतिनिधी- वीर शरीफजीराजे भोसले यांच्या 397व्या स्मृतिदिनी भातोडी येथील त्यांच्या समाधीस उत्तुंग भरारी प्रतिष्ठानच्यावतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी मराठेशाहीतील प्रेरणादायी अशा 1624 च्या लढाईचा इतिहास घराघरात पोहचला पाहिजे, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे यांनी केले. नगर तालुक्यातील भातोडी येथे इ. स. 1624 साली आदिलशाही व मोगल यांच्या संयुक्त फौजेविरुद्ध निजामशाही व दक्षिण भारताचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी महाबली शहाजीराजे व त्यांचे बंधू वीर शरीफजीराजे यांच्या नेतृत्वाखाली प्रसिद्ध ’भातवडीचे युद्ध’ झाले होते. त्यात मराठी इतिहासात प्रथमच गनिमी काव्याचा वापर करून व पराक्रम गाजवून शहाजी राजे यांनी विजय मिळवला पण बंधू शरीफजीराजे यांना वीर मरण आले. त्यांचा 397 वा स्मृतिदिन भातोडी येथे उत्तुंग भरारी प्रतिष्ठानच्यावतीने विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. ध्वजपूजन करून मंत्रोच्चारात वीर शरीफजीराजेंच्या समाधीचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मनपाने सुरू केलेली पर्यटनासाठीची बस यापुढे भातोडी येथील वीर शरीफजीराजे समाधी स्थळी व नृसिंह मंदिरासाठी नियमित येण्यासाठी प्रयत्न करू असे आश्‍वासन इथापे यांनी दिले. अ‍ॅड शेख यांनी आळंदी येथील कुंडाचे महत्व सांगून भातोडी आणि ऐतिहासिक नृिंंसंह मंदिराचे संशोधन करण्याचा संकल्प असल्याचे सांगितले. यावेळी पत्रकार राजेश सटाणकर (नगर),सिद्दी-मराठा इतिहास लेखक व मोडीलिपी तज्ञ प्रा.डॉ.कामाजी डक (औरंगाबाद),किल्ले मंदिर व कुंडचे विशेष अभ्यासक ह.भ.प अ‍ॅड. नाजिम महाराज शेख (आळंदी, जिल्हा पुणे), दुर्गजागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप (पुणे), सावली फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीकांत म्हस्के (टाकळी काझी,ता.जि. नगर) यांचा राजे शरीफजी भोसले पुरस्काराने सन्मान करण्यात आला. स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. या कार्यक्रमास नगर पंचायत समिती सभापती संदीप गुंड, मराठा सेवा संघ पाथर्डी तालुकाध्यक्ष बाळासाहेब सोनाळे, मास्टरमाईंडचे मारूती शेळके, गडवाट परिवाराचे अभिजीत दरेकर, बाळासाहेब भुजबख, टाकळी काझीचे सरपंच शहाजी आटोळे,विलास शेडाळे,उद्योजक सोमनाथ शिंदे,पांडुरंग ढगे, मारूती धलपे,किरण घोलप, ज्ञानेश्‍वर काळे,श्रीकांत म्हस्के,हभप गिरी महाराज, अशोक तरटे, शशिकांत शिंदे,बाबासाहेब लबडे, संपत लबडे, कैलास गांगर्डे उपस्थित होते. दुर्गजागर प्रतिष्ठानने यावेळी परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. सावली प्रतिष्ठानने वृक्षारोपण केले. सूत्रसंचालन प्रा.संजय टाक यांनी केले तर आभार प्रदर्शन संदीप लबडे यांनी केले. कार्यक्रमासाठी मारूती लबडे, दत्ता लबडे, किशोर कदम,विक्रम लबडे, ईश्‍वर लबडे, विक्रम गायकवाड, अभिमान लबडे आदींनी परिश्रम घेतले.

COMMENTS