प्रतिनिधी : दिल्ली आरपीआयचे नेते व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेला सल्ला दिला, ‘शिवसेनेला आपले भवितव्य उज्ज्वल करायचे असल्यास राष
प्रतिनिधी : दिल्ली
आरपीआयचे नेते व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेला सल्ला दिला, ‘शिवसेनेला आपले भवितव्य उज्ज्वल करायचे असल्यास राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत राहू नये. शिवसेना आणि भाजपाने अडीच वर्षांच्या फार्म्युल्यावर एकमत करून एकत्र आले पाहिजे.’ असे ते म्हणाले.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत. शिवसेनेची राष्ट्रवादीशी आघाडी ही तडजोड आहे; टिकणारी नाही, असे वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनंत गीते यांनी केले. यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वथता आहे.
या संदर्भात उल्लेखनीय आहे की, ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला’ असा आरोप अनंत गीते यांनी केला होता.
याबाबत आठवले यांनी शरद पवार यांचा बचाव केला. आठवले म्हणालेत, ‘मी १९९८ साली शरद पवार यांच्यासोबत होतो. शरद पवार यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला असे म्हणणे योग्य नाही.
उलट, काँग्रेसनेच शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला. अनंत गीते यांचा आरोप चूक आहे.’
COMMENTS