भाजप- शिवसेना एकत्र येणार..? मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा… म्हणाले.. तर आपण सहकारी होऊ… (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजप- शिवसेना एकत्र येणार..? मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा… म्हणाले.. तर आपण सहकारी होऊ… (Video)

प्रतिनिधी : औरंगाबादजर तुम्ही मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी पुढाकार घेत असाल तर मी तुमच्या पाठीशी खंभीरपणे उभा राहील, हा शब्द मी देतो, असे आश्वासन

धक्‍कादायक..गळ्यावर वार करून चिमुरडीची हत्‍या
औरंगाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या 52 फूटी अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण
महिला सरपंचानी नियमांची माहिती व अभ्यासतून गावांचा सर्वागींण विकास करावा – पालकमंत्री सुभाष देसाई

प्रतिनिधी : औरंगाबाद
जर तुम्ही मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी पुढाकार घेत असाल तर मी तुमच्या पाठीशी खंभीरपणे उभा राहील, हा शब्द मी देतो, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज औरंगाबाद येथे झालेल्या सभेत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवें दिला. मराठवाड्यात आपण आपआपसात भांडत कशाला बसायचं?

नालायकपणे कारभार करुन आपणही भांडत राहिलो तर फरक काय राहिला. अपेक्षेशिवाय आयुष्य असू शकत नाही, तुम्ही आमच्याकडे आणि आम्ही तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करायच्या. एकत्र आलो तर भावी सहकारी होऊ,

असे सूचक विधान करुन मुख्यमंत्र्यांनी नव्या राजकीय चर्चेला सुरूवात केली आहे. भर सभेत केलेल्या या विधानामुळे मुख्यमंत्र्यांचे भावी सहकारी कोण असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

माझ्या राज्याच्या राजधानी आणि उपराजधानीला जोडणारा लोहमार्ग मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन तुम्ही तयार करणार असाल, तर मी तुमच्या पाठीशी खंभीरपणे उभा राहील. रावसाहेब तुम्ही प्रेझेंटेशन दिलं नाही तरी मला चालेल, आम्ही पाठीशी उभे राहू, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला.

रावसाहेब बऱ्याच दिवसांनी एकत्र आलेत, जुने सहकारी आहेत, गंमत-जंमत हवीच, असं म्हणत आज सुद्धा पैसे द्यायला तुमच्यावर विश्वास ठेवतात की नाही माहीत नाही, असा मिस्कील टोलाही त्यांनी लगावला.

८८ साली औरंगाबादेत सभा झाली तेव्हा मी सभेच्या मागे गच्चीवर पाहत होतो, पण तेव्हा मला माहित नव्हते की मी पण मुख्यमंत्री होऊन कार्यक्रमाला येईन, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मला रेल्वे का आवडते कारण तिला रूळ असतात, रूळ सोडून इंजिन कुठेही जात नाही. त्याला डायव्हर्जन मारलं तर आमच्या स्टेशनवर येऊ शकता. ४५ वर्षात दुसऱ्यांदा उद्घाटन झालं, पण आता तसं होणार नाही, अब्दुलजी आणखी २० कोटी मिळतील पण मला त्याचा हिशोब हवाय,

जे करायचं ते सरळ मार्गाने करीन, मला इकडे ही इमारत उभी राहिलेली पाहिजे म्हणजे पाहिजेच, दया माया दाखवणार नाही, अशा कडक शब्दात उद्धव ठाकरेंनी दम दिला. जे काही गरजेचं आहे ते केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.

क्लायमेट चेंज झालंय हे दुर्भाग्य आहे आपलं. अतिवृष्टी सुद्धा अशी होतेय की काही दिवसांचा पाऊस काही तासात पडतोय. जिल्हा परिषद हे जनतेची सेवा करणारं मंदिर आहे. याचं पावित्र्य राखणे आपले कर्तव्य आहे.

मराठवाड्यात संतपीठ पाहिजेच, मराठवाडा संतांची भूमी आहे. जनता बघायला पाहिजे असं कार्यालय झालं पाहिजे, मी मुंबईत एक वार्ड ऑफिसचं उद्घाटन केलं. ते मला आवडलं कारण तिथे व्यायाम करण्यासाठी जिम बनवली आहे. इथे सुद्धा तशा गोष्टी झाल्या पाहिजेत, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

कामांचा दर्जा चांगला असायला हवा, ही माझी पहिली अट आहे. आणि हे जर मान्य असेल तर मी निधीची कमतरता भासू देणार नाही. पण मला काम पूर्ण करण्याच्या तारखा द्याव्या लागतील त्या तारखेवर कामे पूर्ण झाली तर पैसे तुम्हाला मिळतील. जनतेत खूप बळ आहे, रावचा रंक रंकाचा राव करू शकते, अशी आठवण मुख्यमंत्र्यांनी करुन दिली.

COMMENTS