भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या मध्य मंडळाध्यक्षपदी अशोक भोसले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या मध्य मंडळाध्यक्षपदी अशोक भोसले

अहमदनगर (प्रतिनिधी)-  भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या मध्य मंडळाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते अशोक भोसले यांची नियुक्ती करण्यात आली. गा

शेवगाव-पाथर्डीत लोकसभा निवडणूकीची पुर्वतयारी पूर्ण
प्रधानमंत्री जीवनज्योती योजनेंतर्गत स्टेट बँकेकडून दोन लाखांचा धनादेश प्रदान
दिल्लीश्‍वेरासमोर कदापी झुकणार नाही ः खा. सुप्रिया सुळे

अहमदनगर (प्रतिनिधी)- 

भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या मध्य मंडळाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते अशोक भोसले यांची नियुक्ती करण्यात आली. गांधी मैदान येथील भाजपच्या पक्ष कार्यालयात भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या पद नियुक्ती कार्यक्रमात भोसले यांना उत्तर महाराष्ट्र प्रभारी वाल्मिक निकाळजे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. 

यावेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र उर्फ भैय्या गंधे, अनुसूचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष चंद्रकांत पाटोळे, राज्य सचिव मनेष साठे, विवेक नाईक, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी आदी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अशोक भोसले मागासवर्गीय समाजातील विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी कार्य करत आहे. तसेच झोपडपट्टी भागातील नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. दुर्बल घटकांना न्याय, हक्क मिळवून देण्याकरिता त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरु असून, समाजात असलेले त्यांचे संगठन कौशल्य पाहून त्यांची मध्य मंडळाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. 

COMMENTS