भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या महिला शहराध्यक्षपदी कुसुम शेलार यांची नियुक्ती

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या महिला शहराध्यक्षपदी कुसुम शेलार यांची नियुक्ती

अहमदनगर (प्रतिनिधी)-  भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या महिला शहर जिल्हाध्यक्षपदी कुसुमताई शेलार यांची नियुक्ती करण्यात आली. गांधी मैदान

सर्व समाजघटकांच्या प्रगतीसाठी दर्जेदार विकासकामे करा : उपमुख्यमंत्री पवार
सावधान! माळढोक पाठोपाठ लोकशाही संपवण्याचा डाव
केंद्राने लावले कांदा निर्यातीवर 40 टक्के निर्यात शुल्क

अहमदनगर (प्रतिनिधी)- 

भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या महिला शहर जिल्हाध्यक्षपदी कुसुमताई शेलार यांची नियुक्ती करण्यात आली. गांधी मैदान येथील भाजपच्या पक्ष कार्यालयात भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या पद नियुक्ती कार्यक्रमात शेलार यांना उत्तर महाराष्ट्र प्रभारी वाल्मिक निकाळजे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. 

यावेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र उर्फ भैय्या गंधे, अनुसूचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष चंद्रकांत पाटोळे, राज्य सचिव मनेष साठे, विवेक नाईक, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी आदी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कुसुमताई शेलार यांचे मागासवर्गीय समाजात महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्य सुरु आहे. त्यांचे महिलांमध्ये असलेले संगठन कौशल्य पाहून व त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची अनुसूचित जाती मोर्चाच्या महिला शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.  

COMMENTS