भाजपात घडणार मोठा भूकंप… संजय राऊत मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपात घडणार मोठा भूकंप… संजय राऊत मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना…

प्रतिनिधी : मुंबईकुणीतरी तिकडे आहेत, ज्यांना इकडे यायचे . त्यांच्यासाठी उद्धवजींनी संकेत दिलेत की तुम्ही या , असे संजय राऊत म्हणाले आहेत. या विधानाने

महाराष्ट्रासह पाच राज्यांवर ऑक्सिजनबाबत अन्याय
‘त्या’ दिवसांत नवऱ्याची साथ महत्वाची : प्रिया बापट
सर्वसामान्यांचा पैसा लुटणाऱ्यांना कायद्याच्या कचाट्यात आणा !

प्रतिनिधी : मुंबई
कुणीतरी तिकडे आहेत, ज्यांना इकडे यायचे . त्यांच्यासाठी उद्धवजींनी संकेत दिलेत की तुम्ही या , असे संजय राऊत म्हणाले आहेत. या विधानाने पुन्हा उलट -सुलट चर्चेला उधाण आले आहे . तर आत्ताच आलेल्या माहितीनुसार शिवसेना खासदार संजय राऊत मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी वर्ष बंगल्यावर पोहोचले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेगळ्या स्टाईलने भाषण करतात. त्यांनी भाषणात कुठेही म्हटले नाही की आम्ही सरकारमधून बाहेर पडून नवीन आघाडी तयार करू . ज्यांना भावी सहकारी व्हायचे , ते आमच्याकडे येऊ इच्छित आहेत, असे वक्तव्य उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे केले .

यावरून राजकारण तापले. मागील काही दिवसांपासून राजकीय घडामोडी पहाता चंद्रकांत पाटील म्हणाले की आम्हाला माजी म्हणून नका,यावर या हालचाली सुरु झाल्या .

ज्यांनी शिवसेना भवन फोडण्याची भाषा केली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल अपशब्द वापरले . अशा पक्षांशी आम्ही हातमिळवणी कशी करू शकतो? असा उलट सवाल राऊत यांनी केला .

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार चालत आहे . पुढची तीन वर्षेही असेच सरकार चालत राहणार , असे राऊत म्हणाले. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना टार्गेट करण्यात येत आहे .

मात्र गुडघे टेकून सरेंडर होऊ, त्यांना हवं ते करू, हा कचरा जर कुणाच्या डोक्यात असेल, तर तो कचरा तसाच ठेवा, आम्ही झुकणार नाही, अशा शब्दात राऊतांनी विरोधकांना खडेबोल सुनावले आहे . तसेच एमआयएमसारख्या पक्षांना रोखण्यासाठी ठाकरे सरकार सक्षम असल्याचेही राऊत म्हणाले .

COMMENTS