Homeताज्या बातम्याअग्रलेख

भाजपशासित राज्यात नेतृत्वबदलाचा अन्वयार्थ

भाकर जर फिरवली नाही, तर ती करपते, हा सिद्धांत राजकारणात नेहमीच लागू पडतो. त्यामुळे स्थळ, काळ आणि वेळ बघून भाकर फिरवावी लागते. अन्यथा ती करपते, म्हणजे

सत्ताधारी आणि विरोधकांची ‘दिशा’  
तापमानवाढ रोखण्याचे आव्हान
रचना आणि पुनर्रचना


भाकर जर फिरवली नाही, तर ती करपते, हा सिद्धांत राजकारणात नेहमीच लागू पडतो. त्यामुळे स्थळ, काळ आणि वेळ बघून भाकर फिरवावी लागते. अन्यथा ती करपते, म्हणजेच आपले अस्तित्व संपवते. आणि ती फिरवली तर छान खरपूस लागते. त्यामुळे राजकारणांत देखील वेळोेवेळी नेतृत्वबदल करावा लागतो. भाकरी फिरवल्यामुळे अनेक बदल अनुभवायला मिळतात. याचबरोबर, नवे नेतृत्व पुढे येते. आणि त्याचा पक्षाला फायदा होतो. भाजपने नुकताच चार राज्यात नेतृत्वबदल केला आहे.
भाजप हा पक्ष नेहमीच धक्कादायक निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध आहे. गुजरातमध्ये देखील विजय रूपानी यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर नवे मुख्यमंत्री कोण यावर खलबते सुरू होती. नितीन पटेल जे पटेल समाजाचे असून, त्यांना विधीमंडळाचा दांडगा अनुभव असल्यामुळे, त्यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी घोषित होईल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र भाजपने पुन्हा एकदा प्रथमच 2017 मध्ये आमदार झालेले भूपेंद्र पटेल यांच्या नावाची घोषणा करत त्यांना मुख्यमंत्रीपद देऊ केले. भूपेंद्र पटेल यांना प्रशासकीय अनुभव तसा कमीच आहे. शिवाय ते लोकनेता देखील नाही. ते प्रथमच आमदार झाल्यामुळे पक्षात त्यांचे मित्र नाही, तसे शत्रू देखील नाही. फक्त ते पटेल समाजाचे असून, भाजपचे विश्‍वासू असल्यामुळे त्यांच्यावर ही कमान सोपवण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुका जिंकण्याचे आव्हान भुपेंद्र पटेल यांच्यासमोर असणार आहे.
भाजप हा पक्ष अनेक धक्कादायक निर्णय घेण्यासाठी नेहमीच प्रसिद्ध आहे. कुणाचे मन दुखावण्यासाठी, किंवा कुणाला सांभाळण्यासाठी पक्षात निर्णय घेतले जात नाहीत, तर भविष्यात पक्षावर काय परिणाम होतील ? निवडणुकीत काय रणनीती आखायची यासंदर्भात अनेक धक्कादायक निर्णय भाजप घेत असतो. मागील काही दिवसांमध्ये भाजपने चार राज्यात नेतृत्वबदल केला. यावरून अनेक बाबी स्पष्ट होतात. कर्नाटकात येदीयुरप्पा, उत्तराखंडमध्ये तिरथसिंह रावत आणि त्रिवेंद्रसिंह रावत यांच्याशिवाय आसाममध्ये सर्वानंद सोनोवाल यांनी गुजरातमध्ये विजय रूपानी यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे.
गुजरातमध्ये नेतृत्वबदल करण्यामागे अनेक कंगोरे असून, आगामी विधानसभा निवडणुकांची ही नांदी असल्याचे बोलले जात आहे. गुजरातमध्ये डिसेंबर 2022 मध्ये निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यादृष्टीने भाजपने रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुरुवारी रात्री आठच्या सुमारास अचानक अहमदाबादला पोहोचले होते. त्यांच्या गुजरात भेटीबाबत कोणतीही माहिती सार्वजनिक करण्यात आली नव्हती. गुजरातचे गृहमंत्री प्रदीपसिंह जडेजा, महापौर किरीट परमार आणि स्थायी समिती अध्यक्ष हितेश बारोट विमानतळावर अमित शहा यांचे स्वागत करण्यासाठी पोहोचले होते. त्यानंतर रुपाणी यांचा राजीनामा घेण्यात आला आहे.
विजय रूपानी यांचे व्यक्तीमत्व लोकनेता म्हणून कधीही नव्हते. त्यांचा जनसंपर्क देखील अलीकडच्या काळात कमी झाला आहे. त्यांची पक्षावरची पकड आणि राज्यामध्ये त्यांची घसरती लोकप्रियता लक्षात घेऊन त्यांना राजीनामा देण्यास भाजपने भाग पाडले आहे. शिवाय मागील विधानसभा निवडणुकांमध्ये पटेल समुदाय मोठया प्रमाणावर भाजपवर नाराज असल्याचे दिसून आले. त्यामुळे भाजपला आलेख घसरला होता. त्याचवेळी काँगे्रसने गुजरात निवडणुकीत भाजपला तगडे आव्हान दिले होते. त्यामुळे आगामी निवडणुकीत जिंकायचे असेल, तर नेतृत्वबदल करण्याशिवाय भाजपपुढे पर्याय नव्हता. अखेर भाजपने नेतृत्वबदलाचा निर्णय घेतला. विजय रुपाणी यांची कारकीर्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या छायेखालीच राहिली. रुपानी यांना कधीच स्वतंत्र असे व्यक्तीमत्व नव्हते. ते नेहमीच मोदी आणि शाह यांच्या छत्रछायेखाली वावरत होते. आणि त्यांनीच त्यांना संधी दिली आणि पायउतार होण्याचा संदेश देखील. त्यामुळे रुपानी यांच नेतृत्वबदलल्यामुळे भाजप आमदारांना विशेष असा काही फरक पडणार नाही. किंवा रूपानी यांच्यामागे कुणी आमदार राहील, अशी शक्यता देखील नाही. भाजप पक्षातील नेते आणि सनदी अधिकार्‍यांना कोण निर्णय घेत होते याची चांगलीच कल्पना होती. रुपानी यांचे स्वीय सचिव शैलेश मांडवीय हे पूर्वी अमित शाह यांचे सचिव होते. सचिव अशाप्रकारे शेअर करण्याची प्रथा राजकारण्यांमध्ये नसते. विजय रुपाणी यांना राजीनामा द्यावा लागण्यामागे त्यांचा कमी असलेला लोकसंपर्क त्यांंच्या कारकीर्दीला संपुष्टात आणणारा ठरला.
गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांनी 2014 पर्यंत कारभार सांभाळला. या काळात प्रशासन त्यांच्याभोवती केंद्रीत होते. मात्र त्यानंतर मुख्यमंत्री झालेले आनंदीबेन आणि विजय रूपानी यांची मात्र प्रशासनावर तशी पकड नव्हती. त्यामुळे मोदींच्या कार्यकाळातील प्रशासन आणि रूपानी यांच्या कार्यकाळात ही प्रतिमा हळूहळू बदलली. पंतप्रधान होण्यापूर्वी मोदी 4,610 दिवस गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होते. यामुळे गुजरातमध्ये त्यांचे प्रस्थ चांगलंच वाढत गेले. त्यांच्याबरोबर अनेक वर्षं काम करणारे लोक सांगतात की, मोदी खूप कमी बोलायचे. ठरलेल्या गोष्टी निर्धारित वेळेत पूर्ण करण्यास प्राधान्य द्यायचे. मात्र रूपानी लोकनेता म्हणून ओळख प्रस्थापित करण्यास आणि प्रशासनावर पकड मिळवण्यास अपयशी ठरले. त्यामुळे रुपाणी मुख्यमंत्री असताना झालेल्या निवडणुकीत भाजपची संख्या 115 वरुन 99 वर आल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून नितीन पटेल यांचे नाव सर्वात पुढे आहे. त्यांना मुख्यमंत्रीपदी संधी दिल्यास पटेल समुदाय पुन्हा एकदा भाजपसोबत येऊ शकतो. तसेच पटेल यांच्यामुळे गुजरातमध्ये पक्षाला नवचैतन्य मिळू शकते. ज्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत बघायला मिळू शकतो. त्यामुळे भाजपकडून नेतृत्वबदल करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. शिवाय नेतृत्वबदल केल्यानंतर पायउतार झालेले माजी मुख्यमंत्री आगामी काळात आपल्याला उपद्रवी ठरणार नाही, याची देखील पुरेपूर काळजी भाजप घेतांना दिसून येत आहे. त्यामुळे भाजपने चारही राज्यात लिलया नेतृत्वबदल केला. उत्तराखंडमध्ये तर दोनदा नेतृत्वबदल करण्यात आला. भाजपमध्ये नेहमीच निवडुका लढण्यासाठी पद्धतशीरपणे नियोजन, योग्य व्युहरचना आणि रणनीती आखण्यात येते. त्याजोरावर भाजप अनेकदा यशस्वी होतांना दिसून येत आहे. भाजपने लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीची तयारी आतापासून सुरू केली असून, त्यादिशेने ते पावले टाकतांना दिसून येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केल्यामुळे साहजिकच मोदी सरकारविरोधात ओबीसी समूदायाचा रोष वाढत चालला आहे. या रोषाला रोखण्यासाठी मोदी सरकारने केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करून ओबीसी नेतृत्वाला मंत्रिमंडळात सामावून घेतले. हा ओबीसी समुदायाला पुन्हा एकदा गोंजारण्याचा प्रयत्न होता. त्यामुळेच गुजरातमध्ये पुन्हा एकदा पटेल समुदायाच्या नेतृत्वाला मुख्यमंत्रीपदाची संधी देऊन भाजप आगामी विधानसभा निवडणुकांना सामौरे जाण्याची मनीषा बाळगून आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत इतर कुठल्याही समाजापेक्षा पटेल समाज आपल्या बाजूने हवा, हे भाजपला चांगलेच ठाऊक आहे. त्यादृष्टीने पटेल आगामी निवडणुकांमध्ये काय करिश्मा करतात, ते आगामी काळात स्पष्ट होईलच.

COMMENTS