भाजपला सत्तर जागाही मिळणार नाहीत ; ममता दीदींचे भाकीत

Homeमहाराष्ट्रमुंबई - ठाणे

भाजपला सत्तर जागाही मिळणार नाहीत ; ममता दीदींचे भाकीत

भाजपला विधानसभा निवडणुकीत 70 जागाही मिळणार नाहीत, असा दावा पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला.

डान्स करताना हृदयविकाराच्या झटक्याने व्यक्तीचा मृत्यू.
भाजपच्या मंत्र्यांची पत्रकारांना गायब करण्याची धमकी
छुरी यात्रेदरम्यान फटाक्यांचा स्फोटात 15 जखमी

कोलकाता : भाजपला विधानसभा निवडणुकीत 70 जागाही मिळणार नाहीत, असा दावा पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अन्य नेते एका ठिकाणी एक, तर दुसर्‍या ठिकाणी दुसरेच बोलून गोंधळ तयार करतात, ते खोटारडे आहेत, अशी टीका त्यांनी केली. 

जलपायगुडी जिल्ह्यातील डाबग्राम-फुलबाडी येथे एका सभेला संबोधित करताना ममता म्हणाल्या, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेत आतापर्यंत ज्या 135 जागांवर निवडणुका झाल्या आहेत, त्यात भाजपने आधीच शंभर जागा जिंकल्या आहेत, असे सांगितले; मात्र मी सांगते, की निवडणूक संपल्यानंतर, भाजपला एकूण 294 जागांपैकी 70 जागाही मिळणार नाहीत. भाजप एकाच मुद्द्यावर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे भाष्य करत खोटे बोलत आहे. शाह दार्जिलिंगच्या लेबोंगमध्ये म्हणाले होते, की कुठल्याही प्रकारची एनआरसी होणार नाही. त्यांनी म्हटले आहे, की 14 लाख लोकांची ओळख पटली आहे आणि त्यांना राष्ट्रीय नागरिक रजिस्टरअंतर्गत अवैध प्रवासी शोधण्यासाठी प्रक्रियेच्या आधारे डिटेंशन सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे. पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021 च्या पाचव्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी बॅनर्जी यांनी कूचबिहारच्या मृतांच्या कुटुंबाला भेट दिली. गेल्या शनिवारी मतदानाच्या चौथ्या टप्प्यादरम्यान झालेल्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या चार जणांच्या कुटुंबीयांची त्यांनी या वेळी भेट घेतली. पीडितांना न्याय आणि दोषींना शिक्षा देण्यासाठी आपले सरकार या घटनेची चौकशी सुरू करेल, असे आश्‍वासन ममतांनी या वेळी दिले. तसेच सीतलकुचीतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पाच ’शहीद बेदी’ उभारल्या जातील, असेही ममता म्हणाल्या. 

कूचबिहारमध्ये नेत्यांच्या प्रवेशावर लावण्यात आलेल्या 72 तासांच्या बंदीमुळे आपण त्या दिवशी (शनिवारी) मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी येऊ शकलो नाही, याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. निवडणुकीनंतर आपण पुन्हा एकदा या भागाला भेट देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. 

COMMENTS