भाजपने देशातील जातीवाद, धर्मवाद संपुष्टात आणला…

Homeताज्या बातम्यादेश

भाजपने देशातील जातीवाद, धर्मवाद संपुष्टात आणला…

वेब टीम : लखनौ“जवळपास सर्वच निवडणूकपूर्व सर्वेक्षणे उत्तरप्रदेशात भाजपाचा मोठा विजय होणार आहे. केवळ यूपीतच नव्हे तर उत्तराखंड, गोवा, मणिपूर येथेदेखील

भूपेंद्र पटेलांनी घेतली गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ-पंतप्रधान मोदींकडून शुभेच्छा
जातीनिहाय जनगणनेबाबत लवकरच निर्णय घेऊ : पंतप्रधान मोदींचे आश्‍वासन
जुनी गाडी स्क्रॅप केल्यास नव्या वाहनाची नोंदणी मोफत ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली घोषणा

वेब टीम : लखनौ
“जवळपास सर्वच निवडणूकपूर्व सर्वेक्षणे उत्तरप्रदेशात भाजपाचा मोठा विजय होणार आहे. केवळ यूपीतच नव्हे तर उत्तराखंड, गोवा, मणिपूर येथेदेखील भाजपा परत सत्तेत येईल.

आपल्यासाठी अभिमानाची बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जातीवादाचे, धर्मवादाचे, घराणेशाहीचे राजकारण संपुष्टात आले आहे. आता विकासाच्या राजकारणाचा बोलबाला आहे.” असे प्रतिपादन भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले.

उत्तरप्रदेश, पंजाब, गुजरात या राज्यांमध्ये आगामी काळात विधानसभा निवडणुका होणार आहेत. २०२४ लोकसभा निवडणुकांची ही एकप्रकारे रंगीत तालीमच ठरणार आहे.

यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. अशातच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज उत्तरप्रदेशात बूथ विजय अभियानाची सुरुवात केली आहे.

२०१७मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने ३२५ जागा जिंकल्या. २०१४ व २०१९ लोकसभा निवडणुकांमध्येदेखील राज्यातील जनतेने भाजपाच्या विकासाच्या राजकारणाला भरभरून आशीर्वाद दिला, असेही नड्डा म्हणाले.

COMMENTS