भाजपच्या मंत्र्यांची पत्रकारांना गायब करण्याची धमकी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपच्या मंत्र्यांची पत्रकारांना गायब करण्याची धमकी

आसाम विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्यातील एका मंत्र्याने कथितरित्या दोन पत्रकारांना 'गायब' करण्याची धमकी दिली.

आगामी निवडणुकांमध्ये एकी कायम दाखवा : रामराजे नाईक-निंबाळकर यांचे आवाहन
राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत साई प्रेरणा कलामंच प्रथम
आंबिजळगावमधून तुतारीला जोरदार पसंती : हभप बापूराव निकत

गुवाहाटी :आसाम विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्यातील एका मंत्र्याने कथितरित्या दोन पत्रकारांना ‘गायब’ करण्याची धमकी दिली. वेगवेगळ्या चॅनलशी संबंधित या पत्रकारांनी मंत्र्यांच्या पत्नीच्या वादग्रस्त भाषणाबद्दल बातमी दिली होती. ही घटना समोर आल्यानंतर काँग्रेसने या मंत्र्यांची उमेदवारी रद्द केली जावी, अशी मागणी केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पत्रकारांपैंकी एक पत्रकाराने मोरीगाव जिल्ह्याच्या जगीरोड पोलिस ठाण्यात मंत्र्यांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री आणि भाजपचे उमेदवार पीयूष हजारिका यांच्याविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे; परंतु अद्याप या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

‘प्रतिदिन टाईम’ नावाच्या एका आसामी न्यूज चॅनलने एक ऑडिओ क्लिप प्रसारित केली होती. यामध्ये मंत्री हजारिका यांचा आवाज ऐकू येत असल्याचा दावा चॅनलने केला होता. पत्रकार नजरुल इस्लाम यांच्याशी बातचीत करताना मंत्र्यांनी नजरुल आणि आणखी एक स्थानिक पत्रकार तुलसी यांना त्यांच्या घरातून बाहेर काढून ‘गायब’ करण्याची धमकी दिली. आपली पत्नी एमी बरुआ यांच्या वादग्रस्त वक्तव्याची बातमी प्रसारित केल्यामुळे भाजप उमेदवार नाराज असल्याचे संभाषणातून स्पष्ट होते. एमी बरुआ यांनी एका जाहीर भाषणादरम्यान हे वादग्रस्त वक्तव्य केले होते. मंत्र्यांचं हे धमकीवजा संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष रिपुन बोरा यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे संबंधित आरोपी भाजप उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्याची तसेच त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

COMMENTS