भाई जगतापांविरोधात सोनिया गांधींकडे तक्रार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाई जगतापांविरोधात सोनिया गांधींकडे तक्रार

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्याविरोधात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.

महागाईचा आगडोंब
अजित पवारांची थेट अमित शहांशी खलबते
अभिनेत्री काजोल ला कोरोनाची लागण | LokNews24

मुंबई/प्रतिनिधी: मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्याविरोधात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. काँग्रेसचे आमदार झिशान सिद्यीकी यांनी पत्र लिहून तक्रार केली आहे. माझ्याच पक्षाचा अध्यक्ष माझ्या विरोधात कारवाया करत असल्याचा गंभीर आरोप सिद्यीकी यांनी जगताप यांच्या विरोधातील पत्रात केला आहे.

    सिद्यीकी यांच्या मतदारसंघात काँग्रेस पक्षाने कार्यक्रम घेतला; मात्र स्थानिक आमदार असूनही त्यांना बोलवले नाही. मुंबई युवा काँग्रेस निवडणुकीत झिशान सिद्यीकीला मदत केल्यास पक्षात पद देणार नाही असा इशारा नगरसेवक आणि पदाधिकार्‍यांना जगताप यांनी दिल्याचा उल्लेख पत्रात केला आहे. काही दिवसांपूर्वी वांद्रे-कुर्लान संकुलात पोलिस ठाण्यात मुंबई काँग्रेसने पोलिसांना कोरोनासाठी आवश्यक साधनसामुग्री वाटप केले. त्या कार्यक्रमाला गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनादेखील आमंत्रित करण्यात आले होते; पण स्थानिक आमदार असून झिशान सिद्यीकी याना बोलवण्यात आले नाही. राजशिष्टाचार पाळला जात नाहीत अशी तक्रार पत्रात करण्यात आली आहे. पक्षात माझ्या विरुद्ध काम करणार्‍यांना ताकद दिली जाते, अशी तक्रार सिद्यीकी यांनी पत्रात केली आहे. झिशान यांनी महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील, के सी वेणूगोपाल, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाई जगताप यांनादेखील हे पत्र पाठवले आहे.

COMMENTS