भंडारा रुग्णालय आग घटनेनंतरही सरकार झोपेतच : प्रविण दरेकर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भंडारा रुग्णालय आग घटनेनंतरही सरकार झोपेतच : प्रविण दरेकर

भंडारा जिल्हा रुग्णालय अग्नितांडवात 10 निष्पाप बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर तरी सरकारचे डोळे उघडतील आणि राज्यातील सर्व रुग्णालयांच्या सुरक्षिततेबाबत सरकारकडून तातडीने उपाययोजना होतील, असे वाटले होते.

 देवळाली प्रवरा येथे आदिवासी सन्मान मेळावा उत्साहात
‘शोले’ फेम विनोदी अभिनेते बिरबल यांचे निधन
आधारचा गैरवापर केल्यास होऊ शकतो एक कोटींचा दंड

मुंबई : भंडारा जिल्हा रुग्णालय अग्नितांडवात 10 निष्पाप बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर तरी सरकारचे डोळे उघडतील आणि राज्यातील सर्व रुग्णालयांच्या सुरक्षिततेबाबत सरकारकडून तातडीने उपाययोजना होतील, असे वाटले होते. परंतु, काही दिवसांपूर्वीच भांडुपच्या सनराईज हॉस्पिटलला आग लागली, त्यातही 10 रुग्णांचा मृत्यू झाला होता, अशाच अनेक आगीच्या घटना एकामागून एक घडत असून निष्पाप लोकांना मृत्यूला सामोरं जावं लागत आहे. आज दहिसरच्या कोविड सेंटरला आग लागली, सुदैवाने जीवितहानी झाली नाही, पण या झोपलेल्या सरकारला कधी जाग येईल आणि आरोग्य व्यवस्थेला कधी सुरक्षितता प्राप्त होईल, असा सवाल विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला आहे.

आज सकाळी मुंबईतील दहीसर चेकनाका येथील जंम्बो कोविड सेंटरला आग लागण्याची घटना घडल्यानंतर तातडीने दरेकर यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. वेळीच फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांनी आग आटोक्यात आणल्यामुळे मोठी जीवितहानी टळली असली तरी रुग्णालयांच्या सुरक्षिततेबाबत सरकार काय करीत आहे, हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे. आगीचे कारण अस्पष्ट असून त्याबाबत विविध मतमतांतरे असल्याचे लक्षात आले आहे, यंत्रणांनी एकमेकांवर ढकलाढकली करण्याऐवजी आगीचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी या घटनेची सखोल चौकशी सरकारने करावी, अशी मागणीही दरेकर यांनी केली.

COMMENTS