भंडारदरा धरण भरण्याच्या मार्गावर ; 80 टक्के झाला साठा, मुळा व निळवंडे प्रतीक्षेत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भंडारदरा धरण भरण्याच्या मार्गावर ; 80 टक्के झाला साठा, मुळा व निळवंडे प्रतीक्षेत

अहमदनगर/प्रतिनिधी- नगर शहरासह दक्षिण नगर जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा असली तरी उत्तर नगर जिल्ह्यातील अकोल्यात मात्र पावसाचे प्रमाण समाधानकारक आहे. अको

मुळा धरणाकडे जाणार्‍या रस्त्याचे भाग्य उजळणार
जनार्दन स्वामी महाराजांचे आशीर्वाद कायम – आमदार आशुतोष काळे
राहुरी बस स्थानकासाठी मंजूर झालेले 5 कोटी गेले कोठे ?

अहमदनगर/प्रतिनिधी- नगर शहरासह दक्षिण नगर जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा असली तरी उत्तर नगर जिल्ह्यातील अकोल्यात मात्र पावसाचे प्रमाण समाधानकारक आहे. अकोले तालुक्यातील घाटघर व रतनवाडीत पाऊस बरसत असल्याने उत्तर नगर जिल्ह्याचा आधार असलेले भंडारदरा धरण 80 टक्के भरले आहे. या पार्श्‍वभूमीवर मुळा धरण 55 व निळवंडे धरणाचा पाणीसाठा झाला 40 टक्के झाला आहे.
जिल्ह्यातील मोठ्या धरणांच्या पाणलोटात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील घाटघर व रतनवाडीत पावसाचा जोर पहायला मिळाला. अवघ्या चोवीस तासांतच या दोन्ही ठिकाणी जवळपास सात इंच पावसाची नोंद झाली. मुळा खोर्‍यातील हरिश्‍चंद्रगड व कृष्णवंतीच्या खोर्‍यातील कळसूबाईच्या शिखरांवरही पावसाचा जोर वाढल्याने बुधवारी जिल्ह्यातील या तीनही मोठ्या धरणांत पाण्याची आवक वाढली. गेल्या चोवीस तासात भंडारदरा धरणात हंगामात दुसर्‍यांदा विक्रमी 709 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली. निळवंड्यातील आवकही वाढली आहे. मागील चोवीस तासांत पावसाला पुन्हा एकदा जोर चढल्याने धरणातील पाण्याची पातळी वेगाने वाढू लागली असून 15 ऑगस्टपूर्वीच भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची परंपरा यावर्षी कायम राहणार असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील सर्वात मोठ्या क्षमतेच्या मुळा धरणाच्या पाणलोटातील हरिश्‍चंद्रगडाच्या परिसरासह सर्वदूर पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे मुळा नदीत पाणी वाढले आहे. कोतुळनजीक मुळेतील पाण्याचे प्रमाण 6 हजार 120 क्युसेक्स (1 लाख 84 हजार लिटर प्रति सेकंद) वेगाने पाणी वाहत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची आवक वाढली असून गेल्या चोवीस तासांत मुळा जलाशयाच्या पाण्यात 340 दशलक्ष घनफूटाची नव्याने भर पडून पाणीसाठा 54.63 टक्क्यांवर पोहोचला असून धरणातील एकूण पाणीसाठा 55 टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. प्रवरेची उपनदी असलेल्या कृष्णवंतीच्या खोर्‍यातही पावसाला जोर चढला असून कृष्णवंतीच्या प्रवाहाला वेग दिला असून रंध्याजवळील वाकी जलाशयाच्या भिंतीवरील ओव्हर फ्लो हंगामात पहिल्यांदा 1 हजार 574 क्युसेक्स (48 हजार लिटर प्रति सेकंद) पाणी वाहू लागल्याने निळवंड्यातील पाणीसाठाही वाढू लागला असून चोवीस तासांत 387 दशलक्ष घनफूट नवीन पाण्यासह एकूण पाणीसाठा 38.60 टक्क्यांवर पोहोचला आहे व सायंकाळपर्यंत तो 40 टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्याचे जीवन असलेल्या तीनही धरणात आजच्या स्थितीत समाधानकारक पाणी जमा झाल्याने पाणलोटासह लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

COMMENTS