बैलबाजार रस्त्याचे रखडलेले काम १ मे पर्यंत चालु करा अन्यथा आंदोलन करणार : कुरेशी

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

बैलबाजार रस्त्याचे रखडलेले काम १ मे पर्यंत चालु करा अन्यथा आंदोलन करणार : कुरेशी

कोपरगाव शहर प्रतिनिधी- बैलबाजार हा रस्ता शहरातील उपनगरांना जोडणारा रस्ता आहे. यात प्रामुख्याने निवारा, खडकी, सुभद्रानगर, ओमनगर, गवारेनगर, शंकरनगर व इतर उपनगरातील लोकांसाठी हा सोयीचा मार्ग आहे.

संगमनेर बस स्थानक विकासकाला साडे तीन कोटींचा दंड
गाव तिथे विलगीकरण केंद्र सुरू करावे- विवेक कोल्हे
राज्यपाल येता घरा…कोश्यारींच्या आजच्या दौर्‍यानिमित्त हिवरे बाजारमध्ये साफसफाई

कोपरगाव शहर प्रतिनिधी- बैलबाजार हा रस्ता शहरातील उपनगरांना जोडणारा रस्ता आहे. यात प्रामुख्याने निवारा, खडकी, सुभद्रानगर, ओमनगर, गवारेनगर, शंकरनगर व इतर उपनगरातील लोकांसाठी हा सोयीचा मार्ग आहे.या रस्त्याचे काम जवळपास एक वर्षापासुन बंद पडलेले आहे. नगरपालिकेत १७ डिसेंबर रोजी निवेदन दिले होते व त्या नंतरही वारंवार तक्रार करूनही काहीच उपयोग झाला नाही, ठेकेदारालाही खुप वेळेस सांगितले काम चालु करा परंतु त्यांच्या कडुन काहिच प्रतिसाद मिळत नाही. या रखडलेल्या रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या मोठमोठ्या कपारी आणि पडलेल्या खड्यांमुळे तसेच स्पिडब्रेकर नसल्याने सतत लहानमोठे अपघात घडत आहेत. तरी नगरपालिका प्रशासनास कळकळीची विनंती आहे की बैलबाजार रस्त्याचे काम लवकर चालु करावे. जर १ मे पर्यंत बैलबाजार रस्त्याचे काम चालु झाले नाही तर नगरपालिके समोर धरणे आंदोलन करणार.

COMMENTS