बेळगावात भाजपची सत्ता… आता बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव करा… संजय राऊतांचे आव्हान

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेळगावात भाजपची सत्ता… आता बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव करा… संजय राऊतांचे आव्हान

प्रतिनिधी : मुंबईबेळगाव महापालिकेवर भगवाच फडकला असा दावा करताय तर मग बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव पालिकेच्या पहिल्याच सभेत पारित करा, असं

महावितरण कंपनी खासगी उद्योजकांच्या घशात घालण्याचा डाव – नाना पटोले  
इस्लामपुर अर्बन बँकेला 72 लाख रुपयांचा नफा : अध्यक्ष संदीप पाटील यांची माहिती
रेल्वेत नोकरीच्या आमिषाने चौघांना गंडा l Crime News | Marathi News | Railway Fraud (Video)

प्रतिनिधी : मुंबई
बेळगाव महापालिकेवर भगवाच फडकला असा दावा करताय तर मग बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव पालिकेच्या पहिल्याच सभेत पारित करा, असं आव्हानच संजय राऊत यांनी भाजपला दिलं आहे.

बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीवरुन शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. बेळगावात मराठी माणसांचा पराभव घडवून आणला, असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केला होता.

त्यावर बेळगावात भगवा झेंडाच फडकला आहे असा दावा भाजपने केला आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.

संजय राऊत यांनी ट्विट करून भाजपला हे आव्हान दिले आहे. बेळगावात एकीकरण समितीचा पराभव घडवून आणला. भाजपाचे महाराष्ट्रातील पुढारी म्हणतात आमचा भगवा बेळगावर फडकला.

मग एक करा. पालिकेच्या पहिल्या सभेत बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव मंजूर करा. महाराष्ट्रात पेढे वाटून आनंद व्यक्त करणाऱ्या भाजपाने लगेच ही मागणी करावी. तरच तुमचा भगवा खरा!, असे ट्विट करत राऊत यांनी आव्हान दिले आहे.

COMMENTS