Homeमहाराष्ट्रअहमदनगर

बेलापूर महाविद्यालयात पालक मेळावा उत्साहात

बेलापूर महाविद्यालयात पालक मेळावा उत्साह बेलापूर : येथील बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे कला व वाणिज्य महाविद्यालय बेलापूर आणि जेटीएस शिक्षण संकुलाच्या वतीने पालक मेळावा नुकताच संपन्न झाला. प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना प्रा.योगिराज चंद्रात्रे म्हणाले की, पालकांनी आपल्या पाल्याच्या बाबतीत जागरुक राहून त्यांना बीबीएसीए व बीसीए सारखे व्यवसायिक शिक्षण द्यावे. विद्यार्थ्यांनी त्यासाठी सीईटी परीक्षा देणे गरजेचे आहे. या व्यवसायिक अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांचे करीयर चांगले घडेल असेही ते म्हणाले. बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष आणि महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन राजेश खटोड म्हणाले की, बेलापूर सारख्या ग्रामीण भागात हे कोर्सेस संस्थेने विद्यार्थ्यांसाठी सुरु केले आहेत.या पदव्या घेऊन विद्यार्थ्यांना आर्थिक मदत होईल.या शिक्षणासाठी बारावीच्या कला, वाणिज्य, विज्ञान,एम,सी.व्ही.सी इ. शाखेतील सर्व विद्यार्थ्यांनी बीबीएसीए व. बीसीए प्रवेशासाठी सीइटी परीक्षा द्यावी असे ते म्हणाले. जेटीएस शिक्षण संकुलाचे मुख्याध्यापक डी.डी पुजारी यांनी पालकांना पाल्याबाबत,अभ्यासाबाबत,सीईटीबाबत मार्गदर्शन केले. तर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना बेलापूर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे म्हणाल्या की, संस्थेने चालू केलेल्या या व्यावसायिक शिक्षणाचा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा.सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना पाठबळ द्यावे.  पाल्याच्या आवडीनुसार करिअर करू द्यावे. संगणक अनुप्रयोग क्षेत्रात अभ्यास करुन करीयरच्या विविध संधी मिळवाव्यात आणि महाविद्यालयाचा व संस्थेचा नावलौकिक कमवावा असेही त्या म्हणाल्या.  यावेळी व्यासपीठावर पालक मेळाव्याचे समन्वयक प्रा. डॉ.बाबासाहेब पवार, कार्यालयीन अधिक्षक संदेश शाहिर, प्रा.प्रकाश देशपांडे, डॉ.अशोक माने, प्रा.अशोक थोरात उपस्थित होते.

राजकीय पक्ष मतदाना पुरताच जनतेचा वापर करतात – प्रा.डॉ.मच्छिंद्र सकटे
नगर शहरातील करदात्यांना 75 टक्के शास्ती माफी द्यावी : आमदार संग्राम जगताप यांची मागणी
अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

बेलापूर महाविद्यालयात पालक मेळावा उत्साह

बेलापूर : येथील बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे कला व वाणिज्य महाविद्यालय बेलापूर आणि जेटीएस शिक्षण संकुलाच्या वतीने पालक मेळावा नुकताच संपन्न झाला. प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना प्रा.योगिराज चंद्रात्रे म्हणाले की, पालकांनी आपल्या पाल्याच्या बाबतीत जागरुक राहून त्यांना बीबीएसीए व बीसीए सारखे व्यवसायिक शिक्षण द्यावे. विद्यार्थ्यांनी त्यासाठी सीईटी परीक्षा देणे गरजेचे आहे. या व्यवसायिक अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांचे करीयर चांगले घडेल असेही ते म्हणाले.

बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष आणि महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन राजेश खटोड म्हणाले की, बेलापूर सारख्या ग्रामीण भागात हे कोर्सेस संस्थेने विद्यार्थ्यांसाठी सुरु केले आहेत.या पदव्या घेऊन विद्यार्थ्यांना आर्थिक मदत होईल.या शिक्षणासाठी बारावीच्या कला, वाणिज्य, विज्ञान,एम,सी.व्ही.सी इ. शाखेतील सर्व विद्यार्थ्यांनी बीबीएसीए व. बीसीए प्रवेशासाठी सीइटी परीक्षा द्यावी असे ते म्हणाले.

जेटीएस शिक्षण संकुलाचे मुख्याध्यापक डी.डी पुजारी यांनी पालकांना पाल्याबाबत,अभ्यासाबाबत,सीईटीबाबत मार्गदर्शन केले. तर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना बेलापूर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे म्हणाल्या की, संस्थेने चालू केलेल्या या व्यावसायिक शिक्षणाचा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा.सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना पाठबळ द्यावे.  पाल्याच्या आवडीनुसार करिअर करू द्यावे. संगणक अनुप्रयोग क्षेत्रात अभ्यास करुन करीयरच्या विविध संधी मिळवाव्यात आणि महाविद्यालयाचा व संस्थेचा नावलौकिक कमवावा असेही त्या म्हणाल्या.  यावेळी व्यासपीठावर पालक मेळाव्याचे समन्वयक प्रा. डॉ.बाबासाहेब पवार, कार्यालयीन अधिक्षक संदेश शाहिर, प्रा.प्रकाश देशपांडे, डॉ.अशोक माने, प्रा.अशोक थोरात उपस्थित होते.

COMMENTS