बुऱ्हानगर मंदिरातील भगत पुजारी फैलावतात कोरोनाचा प्रादुर्भाव बुऱ्हानगर ग्रामस्थांचा आरोप

Homeताज्या बातम्याशहरं

बुऱ्हानगर मंदिरातील भगत पुजारी फैलावतात कोरोनाचा प्रादुर्भाव बुऱ्हानगर ग्रामस्थांचा आरोप

अहमदनगर : प्रतिनिधी -  शारदीय नवरात्र उत्सव आज पासून सुरु झाला आहे.बुऱ्हानगर येथील श्री.जगदंबा तुळजाभवानी मंदिर हे तुळजापूर देवीचे स्थान आहे हे मं

अहमदनगर मध्ये एसटी चालकाची गळफास घेऊनआत्महत्या (Video)
राज्य सरकारविरोधात नाराजी व्यक्त होत आहे
ज्येष्ठांनी नव्या पिढीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा – शिवाजीराव ससे

अहमदनगर : प्रतिनिधी – 

शारदीय नवरात्र उत्सव आज पासून सुरु झाला आहे.बुऱ्हानगर येथील श्री.जगदंबा तुळजाभवानी मंदिर हे तुळजापूर देवीचे स्थान आहे हे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून राज्यभर याची ओळख आहे,त्यामुळे शारदीय नवरात्र उत्सवामध्ये भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करत असतात सुमारे एक लाख भाविक याठिकाणी दर्शनासाठी येतात गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या महाभयंकर संकटाला आपण सर्वजण सामोरे जात आहोत.

यासंकट काळात नागरिक भयभीत झाले आहेत काही रुग्णांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू देखील झाला आहे.बुऱ्हानगर देवीचे पुजारी भगत कुटुंबीय कोरोना बाधित असून ते मंदिरामध्ये राजरोसपणे फिरून कोरोनाचा प्रादुर्भाव फैलावत आहेत असा आरोप बुऱ्हानगर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला यावेळी सरपंच रावसाहेब कर्डिले, युवा नेते अक्षय कर्डिले,उपसरपंच जालिंदर जाधव, ग्रामपंचायत सदस्य निखिल भगत,रंगनाथ कर्डिले,रवींद्र कर्डिले, दत्ता तापकिरे,रबाजी कर्डिले,गोवर्धन मोरे,श्रीधर पानसरे,महेश कर्डिले,आनंदा कर्डिले,अमोल घाडगे यांनसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले की,ग्रामस्थ व प्रशासन कोरोनाची संख्या वाढू नये यासाठी उपाययोजना करत आहे परंतु बुऱ्हानगर देवीचे पुजारी भगत कुटुंबीय कोरोना बाधित असतानाही मंदिरामध्ये फिरत आहे. भाविकांच्या जिवाशी ते खेळत आहेत. 

कोरोनाची तिसरी लाट येऊ नये यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाय योजना केल्या जात आहेत मात्र भगत पुजारी कुटुंबीय सर्रासपणे  प्रादुर्भाव फैलावत आहेत स्वतः बाधित असताना विलगीकरण कक्षामध्ये न जाता मंदिरा मध्ये फिरून सर्व भाविकांमध्ये याचा प्रादुर्भाव फैलावत आहेत.याठिकाणी राज्यभरातून भाविक येत असतात कोरोनाचे रुग्ण संख्या वाढल्यास यास जबाबदार सर्वस्वी जिल्हा प्रशासन राहीन याची नोंद घ्यावी असे दिलेल्या निवेदनात नमूद आहे.

होम कोरंनटाइन ठेवण्याचे आदेश नसतानाही भगत कुटुंबीय राजरोसपणे देवी मंदिरा मध्ये भाविकांमध्ये फिरत आहे. गावकऱ्यांनी वारंवार जिल्हा प्रशासनात संबंधित या प्रकाराची माहिती देऊनही जिल्हा प्रशासनाच्यावतीने कुठलीही कारवाई केली जात नाही रुग्ण संख्या वाढल्यास याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहील असाही आरोप ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.

COMMENTS