बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा : सतीश पाटील

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा : सतीश पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी : नेर्ले (ता. वाळवा) येथील बिरोबाबन परिसरात बिबट्याचा थरार गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. सर्व वस्त्यावरील कुत्री तसेच काही शेत

म्युकरमायकोसिसची औषधे कोठूनही मागवा l पहा LokNews24
झोपलेल्या चालकाला मारहाण करून गाडी व पैसे पळवले
पाण्यातून शाळेत जाण्याची जीवघेणी, चिमकुल्याची वाट

इस्लामपूर / प्रतिनिधी : नेर्ले (ता. वाळवा) येथील बिरोबाबन परिसरात बिबट्याचा थरार गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. सर्व वस्त्यावरील कुत्री तसेच काही शेतकर्‍यांची पाळीव जनावरे बिबट्याने खाल्ल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच दिवसा देखील शेतामध्ये जाण्यास शेतकर्‍यांत भीतीचे वातावरण आहे. या बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा. अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थ शेतकर्‍यांना घेऊन उपोषणास बसणार असल्याची माहिती तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष सतीश पाटील यांनी दिली.

नेर्ले येथील हायवेच्या पश्‍चिमेस असलेल्या सदा पाटील मळा, बिरोबाबन, सुळकीडोंगर, कदम वस्ती परिसरामध्ये शेतकर्‍यांना बिबट्याचे सतत दर्शन होत आहे. या परिसरामध्ये असलेल्या शेतकर्‍यांच्या वस्तीवरील पाळीव कुत्री या बिबट्यांच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. 1 आठवड्यापूर्वी प्रकाश आंब्रे यांची 10 हजार रुपये किमतीची शेळी बिबट्याने हल्ला करून ओडत नेली. यावेळी डोळ्यांने बघून देखील मेंढपाळाला काही करता आले नाही. आज  पहाटेच्या सुमारास बिरोबाबन येथील विठ्ठल शिदे, काशिनाथ शिदे, विकास शिदे यांच्या घोड्याच्या शेंगरावर (पिल्लू) बिबट्याने हल्ला करून जखमी केले आहे. 

यादरम्यान संबंधित शेतकरी जागे झाल्याने त्यानी बिबट्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्या घोड्याच्या शेंगरास मानेला मोठी जखम झाल्याने ते बेशुध्दावस्थेत पडले होते. आज दिवसभर येथील शंकर माने यांच्या उसाच्या शेतामध्ये हा बिबट्या तळ ठोकून होता. शेतकरी बघायला गेले तर गुरगुरत होता. वन विभागाच्या काही कर्मचार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली. परंतू त्यांनी सापळा लावण्यास नकार दिला. सापळा परगावी आहे तुम्ही आणा आम्ही लावून देऊ अशा सूचना शेतकर्‍यांना केल्याने शेतकर्‍यांना नाराजी व्यक्त होत आहे. शासनाचे कर्मचारी बिबट्याने शेतकर्‍यांचा बळी घेईपर्यंत वाट पाहणार आहे का? असा प्रतिसवाल शेतकरी करत आहेत या परिसरातील बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा. अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा शेतकर्‍यांनी इशारा दिला आहे.

या परिसरात शेकडो एकर उसाचे क्षेत्र आहे. शेतीबरोबर जोडधंदा म्हणून दुधाचा व्यसाय केला जात असल्याने शेतात शेड बांधून त्याठिकाणी जनावरे बांधली जातात. या ठिकाणी असणार्‍या शेळ्या मेंढ्या कुत्रे यांच्या आशेने या भागात बिबट्याचा वावर वाढला आहे. या बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त व्हावा, अशी मागणी शेतकर्‍यांची आहे.

COMMENTS