बार्शी येथे डिसेंबरमध्ये सहावे समतावादी साहित्य संमेलनाचे आयोजन – प्रा. डॉ.मच्छिंद्र सकटे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बार्शी येथे डिसेंबरमध्ये सहावे समतावादी साहित्य संमेलनाचे आयोजन – प्रा. डॉ.मच्छिंद्र सकटे

बार्शी : समतावादी साहित्य सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र च्या वतीने बार्शी येथे डिसेंबर महिन्यात सहावे समतावादी साहित्य संमेलन होणार असल्याची माहिती समत

मृत्यूला आमंत्रण देणारा प्रवास…
बी क्रिएटिव्ह !
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे विविध उपक्रम

बार्शी : समतावादी साहित्य सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र च्या वतीने बार्शी येथे डिसेंबर महिन्यात सहावे समतावादी साहित्य संमेलन होणार असल्याची माहिती समतावादी सांस्कृतिक चळवळीचे संस्थापक प्रणेते डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी बार्शीत झालेल्या आयोजन बैठकीत दिली. श्री शिवाजी महाविद्यालय येथे पार पडलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार बापू शितोळे होते. यावेळी साहित्य संमेलनाचे निमंत्रक आणि दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनिल अवघडे, शहराध्यक्ष संदीप अलाट उपस्थित होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी.वाय. यादव, कॉम्रेड तानाजी ठोंबरे, उपस्थित होते. यावेळी डॉ. सकटे म्हणाले, बार्शीला अनेक साहित्य संमेलनांचा वारसा आहे. या ठिकाणी फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ यांच्या विचारांचा वारसा आहे. त्याच प्रमाणे ही शाहीर अमर शेख यांची जन्म भूमी आहे. म्हणूनच सहावे समतावादी साहित्य संमेलन येत्या डिसेंबर महिन्यात बार्शी येथे आयोजित करण्याचे ठरवले आहे अशी भूमिका मांडत बार्शीकरांनी साथ द्यावी, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. बैठकी प्रसंगी कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांनी सध्या देशात संस्कृतीच्या नावावर सांस्कृतिक दहशतवाद सुरू असून समतावादी विचारांच्या लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे. म्हणूनच हे संमेलन बार्शीत आपण यशस्वी करू असे आश्‍वासन दिले. अध्यक्षीय भाषणात बापू शितोळे यांनी कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या या भूमीत संमेलनाप्रसंगी कोणतीही कमतरता भासणार नाही अशी हमी देत आपण संमेलन यशस्वी करू असे आश्‍वासन दिले. डॉ. यादव यांनीही या वेळी बार्शीच्या परंपरेला आणि प्रतिष्ठेला शोभेल अशाच प्रकारचे यशस्वीरीत्या संमेलन करून दाखवू असा शब्द बार्शीकर यांचे वतीने प्रा. डॉ. सकटे यांना दिला. फुले-शाहू-आंबेडकर अण्णाभाऊ विचार मंचचे अध्यक्ष श्रीधर कांबळे, डॉ.भारती रेवडकर, सुप्रिया गुंड पाटील, विक्रम सावळे, प्रा. हेमंत शिंदे, शंकर वाघमारे, विजयश्री पाटील, प्रा.बिरा पारसे यांनी विविध सूचना मांडल्या. यावेळी ज्येष्ठ पत्रकार भ.के. गव्हाणे, प्राचार्य डॉ. प्रकाश थोरात, प्रा. अशोक वाघमारे, प्रा. डॉ. भारती रेवडकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा सुप्रिया गुंड पाटील, प्रा. विजयश्री पाटील, राष्ट्रवादीचे प्रवक्ते विक्रम सावळे, प्रा. श्रीधर कांबळे, उमेश पवार, सुभाष जगदाळे, राजेंद्र कसबे, प्रा. बिरा बारसे, गो. सू. कसबे, भीम टायगर संघटनेचे शंकर वाघमारे, दयावान कदम, संगीतराव शिंदे, संतोष बगाडे, निलेश खुडे, अलीपुरचे माजी सरपंच सुरेश कसबे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. सकटे म्हणाले, बार्शीला अनेक दलित साहित्य संमेलनांचा वारसा आहे. या ठिकाणी फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ यांच्या विचारांचा वारसा आहे. म्हणूनच सहावे अखिल भारतीय मराठी समता साहित्य संमेलन येत्या डिसेंबर महिन्यात बार्शीत आयोजित करण्याचे ठरवले आहे अशी भूमिका मांडत बार्शीकरांनी साथ द्यावी, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. बैठकीप्रसंगी कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांनी सध्या देशात संस्कृतीच्या नावावर सांस्कृतिक दहशतवाद सुरू असून समतावादी विचारांच्या लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे. म्हणूनच हे संमेलन बार्शीत आपण यशस्वी करू असे आश्‍वासन दिले. अध्यक्षीय भाषणात बापू शितोळे यांनी कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या या भूमीत संमेलनाप्रसंगी कोणतीही कमतरता भासणार नाही अशी हमी देत आपण संमेलन यशस्वी करू असे आश्‍वासन दिले. डॉ. यादव यांनीही या वेळी बार्शीला शोभेल अशाच प्रकारचे यशस्वीरीत्या संमेलन करून दाखवू असा शब्द बार्शीकर यांचे वतीने प्रा. डॉ. सकटे यांना दिला. फुले-शाहू-आंबेडकर अण्णाभाऊ विचार मंचचे अध्यक्ष श्रीधर कांबळे, डॉ.भारती रेवडकर, सुप्रिया गुंड पाटील, विक्रम सावळे, प्राध्यापक हेमंत शिंदे, शंकर वाघमारे, विजयश्री पाटील, प्रा.बिरा पारसे यांनी विविध सूचना मांडल्या.

COMMENTS