बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पोलिस अधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पोलिस अधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

कर्जत प्रतिनिधी नाशिक येथील कै. पुंजाजी ढिकले सेवाभावी प्रतिष्ठानच्या वतीने श्रीगोंदा तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा घेण्यात आला.

शिक्षक कॉलनीतील धोकादायक विज लाईन थांबवा : नागरिकांचा उपोषणाचा इशारा
खैरी निमगांव रस्त्यावर केबल कंपनीचे नियमबाह्य खोदकाम
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे प्रयोगशील शिक्षण ः डॉ. पराग काळकर

कर्जत प्रतिनिधी

नाशिक येथील कै. पुंजाजी ढिकले सेवाभावी प्रतिष्ठानच्या वतीने श्रीगोंदा तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा घेण्यात आला. श्रीगोंदा येथील एमजेएस कॉलेजमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. तालुक्यातील बारावीच्या परीक्षेत विद्यालयात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

कर्जत विभागाचे पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपजिल्हाधिकारी सुधाकर भोसले, श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले पाटील, प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के आदी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

COMMENTS