बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यास परवानगी मिळवी यासाठी मुख्यमंत्री  यांना निवेदन

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यास परवानगी मिळवी यासाठी मुख्यमंत्री यांना निवेदन

येत्या १४ एप्रिल २०२१ रोजी संविधानकार ,घटनाकार बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यास परवानगी मिळावी या साठी सविता महेंद्र विधाते जिल्हाध्यक्ष अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

अवघी दोन दिवसाची सवलत…मनपाने केले पुन्हा सर्व बंद ; किराणा-भाजी मिळण्यास येणार अडचणी, पोलिसांनी घेतला होता आक्षेप
कोपरगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघाने टाकला नवभारत साक्षरता सर्वेक्षणावर बहिष्कार
नांदगावच्या उपसरपंचपदी भाऊसाहेब गुंड 

कोपरगाव  शहर प्रतिनिधी :- येत्या १४  एप्रिल २०२१ रोजी  संविधानकार ,घटनाकार बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यास परवानगी मिळावी या साठी सविता महेंद्र विधाते जिल्हाध्यक्ष अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.


या निवेदनात विधाते यांनी  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी  महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भाव मुळे उस्फुर्त पणे साजरी न करता सर्व भीम  अनुयायांनी शासनाच्या आदेशानुसार घरात राहूनच साजरी करत आंबेडकराना अभिवादन केले. परंतु या वर्षीच्या १४ एप्रिल २०२१ रोजी देखील राज्यभर कोरोना चे सावट असले तरी शासनाच्या नियमाच्या अधीन राहून भीम अनुयायांना डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यास परवानगी किळावी  वर्षी 14 एप्रिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोरोना महामारीचे सर्व नियम पाळून भीम जयंती शासनाने घालून दिलेले कोरोनाचे सर्व नियम पाळून साजरी करण्यास तमाम महाराष्ट्रातील जनतेला  परवानगी द्यावी ही विनंती.   अशा आशयाचे निवेदन  सविता महेंद्र विधाते जिल्हाध्यक्ष अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग यांनी नुकतेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठवलेल्या  निवेदनाव्दारे मागणी केली आहे.सदरचे निवेदन कोपरगावचे तहसिलदार साहेब योगेश चंद्रे पोलिस निरिक्षक वासुदेव देसले यांनाही देण्यात आले आहे.या निवेदनावर शहराध्यक्ष रवींद्र साबळे,ता.कार्यध्यक्ष यादवराव त्रिभुवन, मंगलताई आव्हाड .ता.कार्यध्यक्ष, गौतम कुशर आदिच्या सह्या आहेत.

COMMENTS