बचत योजनांवरील व्याजावरून केंद्राचे घूमजाव ; नजर चुकीने आदेश काढल्याची सारवासारव; सरकारवर टीकेची झोड

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बचत योजनांवरील व्याजावरून केंद्राचे घूमजाव ; नजर चुकीने आदेश काढल्याची सारवासारव; सरकारवर टीकेची झोड

अल्प बचतीच्या सरकारी योजनांवरील व्याजदरात कपात करण्याचा आदेश हा अधिकाऱ्यांच्या नजरचुकीमुळे काढला गेला, असे स्पष्टीकरण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले आहे.

Nanded : महादेव जानकर परभणी लोकसभा निवडणूक लढवणार | LOKNews24
केंद्र सरकार लवकरच स्मार्ट सिटी योजना गुंडाळणार – मोहन जोशी
केज येथे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल भैय्या राऊत यांचा सत्कार

नवी दिल्ली: अल्प बचतीच्या सरकारी योजनांवरील व्याजदरात कपात करण्याचा आदेश हा अधिकाऱ्यांच्या नजरचुकीमुळे काढला गेला, असे स्पष्टीकरण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले आहे. पुढील आर्थिक वर्षासाठी अल्पबचत योजनांवरील व्याजदर ‘जैसे थे’ राहणार आहेत. नजरचुकीने काढले गेलेले हे आदेश मागे घेण्यात येत आहेत, असे सीतारामन यांनी स्पष्ट केले.

मोदी सरकारने बुधवारी रात्री अल्प बचत योजनांवरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला होता. त्यामुळे काल रात्रीपासून या निर्णयाची प्रचंड चर्चा रंगली होती. अखेर रात्रभरात चक्रे फिरली आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी सकाळी 7.54 मिनिटांनी ट्वीट करून हा आदेश रद्द करत असल्याची घोषणा केली. त्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांचा जीव भांड्यात पडला. नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी (एक एप्रिल ते 30 जून 2021) नवे व्याजदर जाहीर करण्यात आले होते. सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीवरील (पीपीएफ) व्याजदर 0.7 टक्क्याने कमी करून 6.4 टक्क्यांवर आणण्यात आला होता. पोस्टाच्या बचत खात्यावरील वार्षिक व्याजदर चार टक्क्यांवरून साडेतीन टक्के करण्यात आला होता. एक वर्षांच्या मुदतठेवींवरील व्याजदर साडेपाच टक्क्यांवरून 4.4 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनांवरील व्याज 7.4 वरून 6.5 टक्के करण्यात आले होते.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील व्याजदर 6.8 वरून 5.9 टक्के तर किसान विकासपत्रांवरील व्याजदर 6.9 टक्क्यांवरून 6.2 टक्के करण्यात आले होते. सुकन्या समृद्धी योजनेचेही व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुकीत त्याचे गंभीर परिणाम होतील, याची भीती असल्याने सरकारने अल्प बचत योजनांवरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने अवघ्या काही तासात मागे घेतला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपरोधिक शब्दांत सीतारामण यांचे आभार व्यक्त केले. सोबतच इंधन आणि गॅस दरवाढही मागे घेण्याची विनंती सुळे यांनी केली.

……………………

चाैकट

निवडणुकानंतरही व्याजदर कायम ठेवा

…………………

सामान्य गुंतवणुकरांच्यादृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या अल्पबचत योजनांच्या व्याज दर कपातीचा निर्णय मोदी सरकारने निवडणुकीत फटका बसेल, या भीतीपोटीच मागे घेतला, असे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केले. त्यासाठी धन्यवाद; पण सीतारामन यांनी पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यावर व्याजदर पुन्हा घटवणार नाही, असे आश्वासनही द्यावे, अशी मागणी दिग्विजय सिंह यांनी केली. मोदी सरकारने अल्पबचत योजनांच्या व्याज दर कपातीच्या निर्णयाबाबत घेतलेल्या यूटर्नवर टीका केली. निवडणुकीच्या भीतीमुळे मोदी-शाह- निर्मला सरकारने गरीब आणि सर्वसामान्य माणसांसाठीच्या अल्पबचत व्याजदर कपातीचा निर्णय बदलला आहे, असे दिग्विजय सिंह यांनी म्हटले.

COMMENTS