बाप रे… डेंग्यूचा कहर…’या’ राज्याची चिंता वाढली

Homeताज्या बातम्यादेश

बाप रे… डेंग्यूचा कहर…’या’ राज्याची चिंता वाढली

लखनऊ : वृत्तसंस्थाउत्तर प्रदेशात डेंग्यूच्या तापाने कहर माजविला आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ सरकारची चिंता वाढली आहे. आतापर्यंत 100 हून अधिक रुग्णांन

इगतपुरीत 5500 कोटींचा जलविद्युत प्रकल्प होणार
Kopardi Rape And Murder Case : कोपर्डी अत्याचार व खून प्रकरणाची सुनावणी तहकूब
जागतिक हेपाटायटिस दिन जिल्हा प्रशिक्षण केंद्र नाशिक येथे साजरा

लखनऊ : वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशात डेंग्यूच्या तापाने कहर माजविला आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ सरकारची चिंता वाढली आहे. आतापर्यंत 100 हून अधिक रुग्णांना डेंग्यूमुळे प्राण गमवावे लागले.

एकट्या फिरोजाबादमध्ये 50 बळी गेले असल्याचे वृत्त आहे. यात मुलांची संख्या सर्वाधिक आहे. राज्यात जवळपास 55 मुलांना डेंग्यूमुळे प्राण गमवावे लागले. फिरोजाबादचे जिल्हाधिकारी चंद्र सिंह विजय यांनी तीन वैद्यकीय अधिकार्‍यांना तातडीने निलंबित केले आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) 11 सदस्यांचे पथक फिरोजदाबादमध्ये दाखल झाले असून तापामागच्या कारणांचा शोध घेत आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशात महिन्याभरासाठी कूलर वापरास बंदी घालण्यात आली आहे.

कूलरमधील पाण्यात डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होते. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. मथुरेत 17, मैनपूरीत 3, कासगंजमध्ये दोघांना डेंग्यूमुळे प्राण गमवावे लागले आहे. गोंडामध्ये दररोज तीन हजारांहून अधिक डेंग्यूसदृश्य तापाचे रुग्ण तपासणीसाठी रुग्णालयात येत आहेत.

COMMENTS