बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी घेतली भेट (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी घेतली भेट (Video)

टाकळी, तालुका परंडा येथील अकरा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. वंचित बहुजन आघाडीच्या परंडा तालुका आणि जिल्हा कार्यकारिणीने सदर गावास भेट

इंधन दिलासा !, नगरपरिषद निवडणुकांना स्थगिती ; शिंदे-फडणवीस सरकारचे निर्णय
संकटाला तोंड देऊन यश खेचून आणता आले पाहिजे :आमदार शिरसाठ
बोअरवेलमध्ये पडलेल्या सागरला वाचवण्यात अपयश

टाकळी, तालुका परंडा येथील अकरा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. वंचित बहुजन आघाडीच्या परंडा तालुका आणि जिल्हा कार्यकारिणीने सदर गावास भेट देऊन विचारपूस केली. सदर पीडित मुलगी दवाखान्यामध्ये उपचार घेत असल्याने दवाखान्यात जाऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तिच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली. यातील आरोपी प्रकाश शंकर बारस्कर यास अटक करण्यात आली आहे. मुलीच्या चुलत्यांकडे विचारपूस केली असता त्यांनी प्रकरणाची माहिती दिली. 30 सप्टेंबर रोजी दुपारी तीन ते चारच्या दरम्यान पीडित मुलगी दळण्यासाठी पिठाच्या गिरणीकडे गेली होती.  एका शेताजवळ आरोपीने मुलीला अचानक पाठीमागून येऊन तोंड दाबून कापसाच्या पिकात उचलून घेऊन जात बलात्कार केला. मुलीने हा प्रकार आई-वडिलांना सांगितला. घटनेची वाच्यता केल्यास आणखीन दोन तीन मुलीवर असाच प्रकार करेन अशी धमकी आरोपीने दिली होती. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के, शहाजी चंदनशिवे, मोहन दादा बनसोडे, दयानंद बनसोडे, रणधीर मिसाळ आणि किरण बनसोडे भेटीदरम्यान उपस्थित होते. पीडित मुलीच्या घरच्यांना काही अडचण आल्यास वंचित बहुजन आघाडी आपल्या पाठीशी आहे असे आश्वासन यावेळी देण्यात आले. आरोपीस कठोर शासन व्हावे यासाठी वंचित बहुजन आघाडी सर्वपोतरी प्रयत्न करणार आहे असे यावेळी सांगण्यात आले.

COMMENTS