फूड डिलिव्हरी सर्व्हिस कंपनी झोमॅटोने 17 सप्टेंबरपासून किराणा मालाची डिलिव्हरी सेवा बंद

Homeताज्या बातम्यामनोरंजन

फूड डिलिव्हरी सर्व्हिस कंपनी झोमॅटोने 17 सप्टेंबरपासून किराणा मालाची डिलिव्हरी सेवा बंद

ऑनलाईन फूड डिलिव्हरी सर्व्हिस कंपनी झोमॅटोने 17 सप्टेंबरपासून किराणा मालाची डिलिव्हरी सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑर्डर पूर्ण होण्यास होणारा

कुरघोडी करण्याऱ्या चीनला खडसावले
हातचलाखीने बदलले कार्ड, खात्यातून काढले 43 हजार
भाजपाला सलग सात वर्ष सर्वाधिक देणग्या

ऑनलाईन फूड डिलिव्हरी सर्व्हिस कंपनी झोमॅटोने 17 सप्टेंबरपासून किराणा मालाची डिलिव्हरी सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑर्डर पूर्ण होण्यास होणारा विलंब, ग्राहकांचा अल्प प्रतिसाद आणि वाढती स्पर्धा लक्षात घेऊन कंपनीने हा निर्णय घेतला आहे. इतर स्पर्धक कंपन्या मालाच्या घरपोच डिलिव्हरीसाठी 15 मिनिटं घेतात. झोमॅटो यामध्ये मागे पडत होती.

त्यामुळे आता झोमॅटोन ग्रॉफरमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपल्या किराणा भागीदारांना दिलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे की, “झोमॅटो आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा पुरवण्यावर आणि आमच्या व्यावसायिक भागीदारांना वाढीच्या सर्वात मोठ्या संधी देण्यावर विश्वास ठेवते. आमच्या ग्राहकांना आणि व्यावसायिक भागीदारांना असे फायदे देण्याचा सध्याचे मॉडेल हा सर्वोत्तम मार्ग आहे असे आम्हाला वाटत नाही. म्हणून, आम्ही 17 सप्टेंबर 2021 पासून किराणा मालाची प्रायोगिक वितरण सेवा बंद करू इच्छितो.

COMMENTS