फलटण येथे जुगार अड्ड्यावर छापा; पावणेदोन लाखाचा मुद्देमाल जप्त

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फलटण येथे जुगार अड्ड्यावर छापा; पावणेदोन लाखाचा मुद्देमाल जप्त

फलटण शहर पोलीस स्टेशन हद्दीतील जिंती नाका फलटण येथे पोलीसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून सुमारे 1 लाख 69 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का ; शिंदेंकडून शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर
कोकणातील तरुणाची पुण्यात हत्या
ठाणे महापालिकेत प्रशासकीय राजवटीतील दुसरा अर्थसंकल्प आज होणार सादर

फलटण / प्रतिनिधी : फलटण शहर पोलीस स्टेशन हद्दीतील जिंती नाका फलटण येथे पोलीसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून सुमारे 1 लाख 69 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशन मधून मिळालेली माहीती अशी कि, दि. 1 एप्रिल रोजी सुमारास जिंती नाका फलटण यशवंतराव चव्हाण पुतळ्याचे बंद शटरचे गाळ्यात मनोज आत्माराम जाधव (रा. जिंती नाका फलटण) याने स्वतःच्या फायद्याकरता ऑनलाईन चक्री जुगार खेळण्यासाठी इसमाकडून रोख रक्कम स्वीकारून जुगार चालवत असताना मिळून आला.

यावेळी ज्ञानेश्‍वर उत्तम राजगुरू, सुरज राजू जाधव (दोघे रा. मलटण, ता. फलटण), सागर बाबुराव जाधव, मनोज आत्माराम जाधव, वसंत चव्हाण, अतुल शिवाजी जाधव, संतोष वसंत जाधव (सर्व रा. जिंती नाका फलटण), वैभव संजय निंबाळकर (रा. विंचुरणी, ता. फलटण), रवींद्र बाळू चव्हाण (रा. पलूस, जिल्हा सांगली), आकाश भाऊसाहेब सावंत (रा. फलटण, तालुका फलटण) हे या ठिकाणी जुगार खेळताना आढळून आले आहेत. यामध्ये टीव्ही तोशिबा कंपनीचा, झेबीअन कंपनीचा सीपीयू, कीबोर्ड, माऊस, केबल, जिओ कंपनीचा इंटरनेट डोंगल, एक लहान टेबल, एक मोठा टेबल, प्लास्टिक खुर्ची, चार प्लास्टिक स्टूल, दोन पाण्याचे जार, दोन मोटारसायकली असा एकूण 1 लाख 69 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे.

याबाबतची फिर्याद पोलीस शिपाई अच्युत साहेबराव जगताप यांनी दिली. पुढील तपास सपोनि गायकवाड करत आहेत.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, सपोनि सचिन राऊळ, पोलीस नाईक वाडकर, पोलीस नाईक तांबे, पोलीस शिपाई जगताप, चालक पोलीस नाईक घाटगे, पोलीस शिपाई दडस यांनी केली आहे.

COMMENTS