फलटण येथील मोरया हॉस्पिटलमध्ये म्युकरमायकोसिसच्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फलटण येथील मोरया हॉस्पिटलमध्ये म्युकरमायकोसिसच्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया

फलटण येथील मोरया हॉस्पिटलमध्ये म्युकरमायकोसिसच्या रुग्णावर डॉ. जनार्दन पिसाळ यांनी यशस्वी शस्त्रक्रिया झाली.

स्वस्तातील साखरेचा मोह पडला महागात, अडीच लाख लुटले
लिफ्ट मागून वाहनचालकांना लुटणार्‍या महिलेस पकडले
भरधाव गाडीने चार जणांना उडवले ; घटना CCTV मध्ये कैद | LOK News 24


फलटण / प्रतिनिधी : फलटण येथील मोरया हॉस्पिटलमध्ये म्युकरमायकोसिसच्या रुग्णावर डॉ. जनार्दन पिसाळ यांनी यशस्वी शस्त्रक्रिया झाली. फलटण तालुक्यातील म्युकरमायकोसिस वरील ही पहिलीच शस्त्रक्रिया डॉ. जनार्दन पिसाळ यांनी पार पाडली आहे.

साध्यस्थीतीत कोरोनानंतर व कोरोना रुग्णामध्ये म्युकरमायकोसिस हा आजार होण्याचे प्रमाण खूप वाढू लागले आहे. म्युकरमायकोसिस या आजारात यशस्वी उपचार पध्दतीमध्ये दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया व त्यासोबत अ‍ॅम्फोटेरिसीन-बी इंजेक्शनची आवश्यकता असते. फलटण येथील मोरया हॉस्पिटल येथे कान-नाक-घसा तज्ञ डॉ. जनार्दन पिसाळ हे अनेक उत्तमपणे उपचार करत आहेत. फार कमी कालावधीत डॉ. पिसाळ यांनी तालुक्यासह जिल्ह्यात नावलौकिक मिळवला आहे.

म्युकरमायकोसिसच्या रुग्णांस गरजेची असलेली शस्त्रक्रिया फलटणमधील मोरया हॉस्पिटल येथे दुर्बिणीद्वारे डॉ. जनार्दन पिसाळ यांनी यशस्वी केली. ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी भूलतज्ञ डॉ. पवन भुजबळ, फिजिशियन डॉ. सौरभ खराडे, डॉ. अमोल घाडगे व डॉ. योगेश गांधी या तज्ञांच्या पथकाचे मोलाचे सहकार्य केले. 

फलटणमध्ये म्युकरमायकोसीस रुग्णांवर यशस्वीपणे उपचार करण्यासाठी कान, नाक, घसा तज्ञ डॉ. जनार्दन पिसाळ यांनी भूलतज्ञ, फिजिशियन, नेत्ररोग तज्ञ व डेंटल सर्जन यांचे एक पथक तयार केले आहे. यापुढे हे पथक म्युकरमायकोसीसच्या रुग्णावर फलटण येथे उपचार करणार असल्याचे डॉ. पिसाळ यांनी सांगितले.

डॉ. जनार्दन पिसाळ यांच्या पत्नी डॉ. पूनम पिसाळ या देखील हृदयरोग तज्ञ असून या डॉक्टर दाम्पत्यांनी कोरोना काळात केलेली रुग्णसेवा तसेच साध्यस्थीतीत करत असलेली रुग्णसेवा वाखणण्याजोगी आहे. म्युकरमायकोसीस या गंभीर आजारावर फलटण तालुक्यात उपचार मिळत असल्याने म्युकरमायकोसीस झालेल्या रुग्णांना मोरया हॉस्पिटल हा आशेचा किरण मिळाला आहे.

COMMENTS