फडणवीस यांच्या  पवार भेटीने राजकीय चर्चांना उधाण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फडणवीस यांच्या पवार भेटीने राजकीय चर्चांना उधाण

राज्यातील राजकारणात नव्या चर्चांना उधाण आणणारी मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबई येथील सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे.

‘हाऊसफुल 5’ ची घोषणा ; दिवाळीत होणार प्रदर्शित
आंबट गोड चिंचामुळे अनेकांना मिळाला रोजगार
नाष्ट्याला खारी, टोस्ट खाताय… मग हा किळसवाणा व्हिडीओ पहाच…

मुंबई/प्रतिनिधीः राज्यातील राजकारणात नव्या चर्चांना उधाण आणणारी मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबई येथील सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ चर्चादेखील झाली. यामुळे आता राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. 

फडणवीस यांनी या भेटीचा फोटो ट्वीट करून, माहिती दिली आहे. पवार यांची आज त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली, असे ट्वीट फडणवीस यांनी केले आहे. पवार यांच्यावर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली आहे. यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना पवार यांनी अनेकदा विविध कारणांसाठी त्यांची भेट घेतलेली आहे. त्यामुळे आता फडणवीस यांनीदेखील पवार यांची भेट घेतली असल्याचे एक कारण सांगितले जात आहे. याशिवाय राज्यात सध्या मराठा आरक्षण व अनेक महत्वाच्या मुद्यांवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पवार हे ज्येष्ठ नेते असल्याने याबाबतही या भेटीत चर्चा झाली असावी. दरम्यान, ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या सर्व पुनर्विचार याचिका फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली. न्यायालयाच्या या निकालानंतर फडणवीस यांनी सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. महाराष्ट्रात ओबीसीसाठी राजकीय आरक्षण शिल्लक राहिलेले नाही, असे सांगत फडणवीस यांनी आरक्षण कशाप्रकारे घालवले हे समोर ठेवायचे असल्याचे सांगितले. आरक्षण रद्द होण्यास राज्य सरकार कारणीभूत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

COMMENTS