फडणवीस, दरेकरांची भूमिका महाराष्ट्रद्वेषी : जगताप

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फडणवीस, दरेकरांची भूमिका महाराष्ट्रद्वेषी : जगताप

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

राम नवमी निमित्त आयोजित प्रभू श्रीराम यांची जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आव्हाड यांच्या हस्ते आरतीचे आयोजन 
आरोपी पलायनप्रकरणी राहुरीचे पोलिस निरीक्षक इंगळे निलंबित
कोपरगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा

 मुंबई/प्रतिनिधी : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. रेमडेसिव्हीरबद्दल फडणवीस आणि दरेकर यांची भूमिका महाराष्ट्र द्वेषी असल्याचा घणाघात जगताप यांनी केला.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील महाराष्ट्र द्वेषी आहेत. त्यांनी फायनान्स सेंटर अहमदाबादला नेले. फडणवीसही आता गुजरात मॉडेलचे अनुकरण करताना महाराष्ट्र कसा मागे राहील हे पाहत आहेत, असा गंभीर आरोप जगताप यांनी केला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी पंतप्रधानांकडे वेळ नाही; मात्र पश्‍चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचारासाठी त्यांच्याकडे वेळ आहे, अशी टीका जगताप यांनी मोदी यांच्यावर केली. फडणवीस हे सत्तेसाठी किती लाचार झाले आहेत. त्यांच्या परवाच्या कृत्यामुळे राज्याचे नाव धुळीस मिळाले. रेमडेसिव्हीरचा साठा केलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी फडणवीस जातात? असा उपरोधिक सवालही जगताप यांनी विचारला. टाळेबंदी उठल्यानंतर फडणवीस आणि भाजपला सळो की पळो करुन सोडल्याशिवाय राहणार नाही. फडणवीसांची 100 पापे भरली आहेत. रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला

COMMENTS