फडणवीसांच्या काळात माझ्याही फोनचे टॅपिंग : खडसे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फडणवीसांच्या काळात माझ्याही फोनचे टॅपिंग : खडसे

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी फोन टॅप केल्याचे प्रकरण सध्या राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात गाजत आहे.

पेन्शन धारकांनी केले धरणे आंदोलन, शेकडो निवृत्त कर्मचारी झाले संपात सहभागी
बॉलीवूड अभिनेत्री अर्शिन मेहता सोबत दिलखुलास संवाद l Bollywood Actress Arshin Mehta l पहा LokNews24
सगे-सोयर्‍यांना जात प्रमाणपत्र म्हणजे आरक्षण कायद्यात ढवळाढवळ

जळगाव/प्रतिनिधी : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी फोन टॅप केल्याचे प्रकरण सध्या राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात गाजत आहे. फोन टॅपिंगवरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी त्यांचाही फोन टॅप करण्यात येत होता, असा आरोप केला. 

मुक्ताईनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी फोन टॅप करण्यात आल्याचे सांगितले. मंत्रिमंडळामधून मला राजीनामा द्यायला लावला, तेव्हापासून माझा फोन टॅप केला जातो, असे मला एका वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले होते. दिल्ली विधानसभेच्या निवडणुका सुरू असताना त्या कालखंडात माझा फोन टॅप होत होता, अशी मुलाखत दिली होती. त्यामुळे तेव्हापासून माझी तक्रार आहे. त्या वेळी माझ्या तक्रारीनंतर अतिरिक्त मुख्य सचिवांनी चौकशी केली होती. त्या कालखंडापासून तर आतापर्यंत मला शंका आहे, की माझा फोन टॅप होत आहे. तसे मला जाणवत होते. त्यामुळे त्यातील तथ्य काय आहे हे शोधण्याची विनंती मी सरकारला पत्राद्वारे करणार असल्याचे खडसे यांनी सांगितले.

COMMENTS