प्राथमिक शिक्षक बँकेच्या चेअरमनपदी अविनाश निंभोरे

Homeताज्या बातम्याशहरं

प्राथमिक शिक्षक बँकेच्या चेअरमनपदी अविनाश निंभोरे

अहमदनगर (प्रतिनिधी)-  अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवड निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर

अवघ्या 10 मिनिटांत घर बसल्या बनवा पॅन कार्ड | पहा ‘सकाळच्या बातम्या’ | Lok News24
समन्यायी पाणी वाटपाचा प्रश्‍न पुन्हा उच्च न्यायालयात
’वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ जीवनात हवीत ः कल्पनाताई वाघुंडे

अहमदनगर (प्रतिनिधी)- 

अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवड निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. चेअरमनपदी अविनाश निंभोरे तर व्हाईस चेअरमनपदी गंगाराम गोडे यांची निवड झाली. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप मुरदारे यांचे सहकार्य लाभले.

  या निवडीत अविनाश निंभोरे हे 13 मते मिळवून चेअरमन तर व्हाईस चेअरमनपदी गंगाराम गोडे यांची बिनविरोध निवड झाली. अविनाश निंभोरे यांना सूचक म्हणून माजी व्हाईस चेअरमन नानासाहेब बडाख तर राजू मुंगसे यांनी अनुमोदक म्हणून सह्या केल्या होत्या.

शिक्षक परिषदेचे नेते रावसाहेब रोहोकले, संजय शेळके, प्रवीण ठुबे, विकास डावखरे, संजय शिंदे,भाऊसाहेब ढोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड झाली. यावेळी बँकेच्या संचालिका सीमाताई क्षिरसागर, उषाताई बनकर, मंजुषाताई नरवडे, विद्युल्लताताई आढाव, संचालक संतोष अकोलकर, दिलीप  औताडे, राजेंद्र मुंगसे, नानासाहेब बडाख, संतोष दुसुंगे, शरद सुद्रिक, अर्जुन शिरसाठ, अनिल भवार, सलीमखान पठाण, सुयोग पवार, किसन खेमकर, बाळासाहेब मुखेकर, बाबा खरात, राजू रहाणे, साहेबराव अनाप आदी उपस्थित होते.

COMMENTS