प्रदीर्घ चौकशीनंतर अनिल देशमुखांना अटक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रदीर्घ चौकशीनंतर अनिल देशमुखांना अटक

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) अटक केलीय.देशमुख सोमवारी दुपारी चौकशीसाठ

करंजीतील काळे विद्यालय व जिल्हा परिषद शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश
बुऱ्हानगर मंदिरातील भगत पुजारी फैलावतात कोरोनाचा प्रादुर्भाव बुऱ्हानगर ग्रामस्थांचा आरोप
भारतरत्न स्व इंदिराजी गांधी ह्या देशाचे सर्वात खंबीर नेतृत्व – ना थोरात

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) अटक केलीय.
देशमुख सोमवारी दुपारी चौकशीसाठी ईडी कार्यालयात उपस्थित झाले होते. ईडीने त्यांची तब्बल 13 तास चौकशी केली. मध्यरात्री 1 वाजेनंतर त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती ईडीचे जॉईंट डायरेक्टर सत्यव्रत कुमार यांनी दिली. अनिल देशमुख यांना अटक केल्यानंतर रात्री 3 वाजेपर्यंत अनिल देशमुख हे त्यांचे वकील इंद्रपाल सिंग यांच्याशी चर्चा करत होते. रात्री 3 वाजताच्या दरम्यान वकील इंद्रपाल हे देखील ईडी कार्यालयामधून बाहेर पडले, तेव्हा त्यांनी आपण या अटकेला न्यायालयात विरोध करणार आहोत, अशी माहिती दिली. आज सकाळी 10 वाजता देशमुख यांना वैद्यकीय तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात येईल, तिथून ठीक 11 वाजता त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल. किमान 7 दिवसांची तरी ईडी न्यायालयात देशमुख यांची कोठडी न्यायालयात मागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज ईडी आणि न्यायालयत येथे अनेक मोठ्या घडामोडी घडणार आहेत. तर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी या अटकेवर बोलताना अनिल देशमुख यांना अटक झाली असून पुढील नंबर हा अनिल परब यांचा असल्याचे म्हटले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख गेल्या बऱ्याच काळापासून नॉट रिचेबल होते. त्यानंतर सोमवारी अचानक त्यांनी आपला जबाब ईडीसमोर नोंदवला. तब्बल 13 तास त्यांची चौकशी सुरु होती. अखेर चौकशीअंती त्यांना अटक करण्यात आली. मनी लॉन्ड्रींग प्रकरणी अनिल देशमुख ईडीच्या रडारवर आहेत. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटके आणि 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपांनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि आयपीएस अधिकारी परमबीर सिंह हे वेगवेगळ्या तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. पण हे दोघेही तपास यंत्रणांच्या हाती मात्र लागत नव्हते. चार ते पाच वेळा समन्स बजावल्यानंतरही अनिल देशमुख ईडीसमोर हजर न राहिल्यामुळं त्यांच्या नावाने लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आले होते. तसेच अनिल देशमुखांचा शोध घेण्यासाठी ईडीनं सीबीआयकडे मदत मागितली होती. अशातच सोमवारी अनिल देशमुख स्वतः ईडीसमोर आपला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहिले.

COMMENTS