पोलीस अधीक्षक डॉ. दत्‍तराम राठोड यांनी मिळवली सायबर लॉ पदवी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलीस अधीक्षक डॉ. दत्‍तराम राठोड यांनी मिळवली सायबर लॉ पदवी

अहमदनगर –  प्रतिनिधी  वाहनाच्या वापरण्यास बंदी असलेल्या एलबीटी प्रकारच्या घातक डिझेलमध्ये रंग बदलून डिझेलची तस्करी करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा भांडाफो

वेगात वाहने चालवणार्‍या दोघांना दणका, गुन्हे दाखल
देशात 24 तासात आढळले 17 हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण
उद्धव ठाकरे परिवारावर 19 बंगला घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे – किरीट सोमय्या

अहमदनगर –  प्रतिनिधी 

वाहनाच्या वापरण्यास बंदी असलेल्या एलबीटी प्रकारच्या घातक डिझेलमध्ये रंग बदलून डिझेलची तस्करी करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा भांडाफोड करुन शहरात चर्चेचा विषय ठरलेले नगरचे तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दत्‍तराम राठोड यांना नुकताच डिप्लोमा इन सायबर लॉ ही पदवी  मिळाली आहे. याच बरोबर आता दत्‍तराम राठोड यांच्याजवळ एकूण 13 पदव्या झाले आहे.

माणिकचंद पहाडे लॉ कॉलेज औरंगाबाद मधून त्यांनी 85 टक्के मिळवून ही पदवी प्राप्त केली आहे. नुकताच जाहीर झालेल्या निकालांमध्ये दत्ताराम राठोड यांनी 400 पैकी 340 गुण मिळवले आहे. या यशानंतर डॉ. दत्ताराम राठोड यांच्यावर सगळीकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

राठोड यांची ऑक्टोबर 2020 मध्ये नांदेड येथून अहमदनगर शहरात बदली झाली होती. पदभार स्वीकारल्यानंतर महिन्याभरात राठोड यांनी शहरात चालणारे अवैध धंद्यांवर  अनेक ठिकाणी छापे टाकत कारवाई केल्या होत्या. मात्र त्यानंतर एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राठोड यांची नगर शहरातून बदली करण्यात आली होती. 

COMMENTS