पोलिसांवरील हल्ल्याचा सर्वस्तरातून निषेध

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

पोलिसांवरील हल्ल्याचा सर्वस्तरातून निषेध

संगमनेरला गुरुवारी सायंकाळी झालेल्या पोलिसांवरील हल्ल्याचा सर्वस्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला.

बियाणे, खते तपासणीसाठी जिल्ह्यात 15 भरारी पथके
सातारा-स्वारगेट मार्गावर ई-शिवाई बस सोडण्याची मागणी
बुऱ्हानगर मंदिरातील भगत पुजारी फैलावतात कोरोनाचा प्रादुर्भाव बुऱ्हानगर ग्रामस्थांचा आरोप

अहमदनगर/प्रतिनिधी-संगमनेरला गुरुवारी सायंकाळी झालेल्या पोलिसांवरील हल्ल्याचा सर्वस्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला. शिवराष्ट्र सेनेसह जिल्हा सराफ सुवर्णकार संघटनेने या हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली तसेच सोशल मिडियातूनही या हल्ल्याबाबत संताप व्यक्त केला गेला.

    शिवराष्ट्र सेना पक्षाच्यावतीने संगमनेरला पोलिसांवर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे व पदाधिकार्‍यांच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. पोलिस आपल्या कुटुंबापासून लांब राहून व कोरोना महामारीपासून जनतेच्या आरोग्याचे रक्षण करतात. सध्या सर्वात जास्त बळी पोलिसच जात असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला असल्याने शिव राष्ट्र सेना पक्षाच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात येत आहे व या हल्ल्यात जे अपराधी आहेत, त्यांच्यावर कायदेशीररित्या कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी यात करण्यात आली आहे.

     याबाबत नवसुपे यांनी सांगितले की, संगमनेर तालुक्यात काही जमावाकडून पोलिसांवर हा हल्ला झाला. पोलिस हे कोरोना काळात देवदूत आहेत. तसेच ज्या संगमनेर तालुक्यात महसुल मंत्री बाळासाहेब थोरात राहतात व ते स्वत: सत्ताधारी पक्षात मंत्रीपदी आहेत व त्यांचे मेव्हणे डॉ. सुधीर तांबे हे स्वत: आमदार आहेत. त्यांच्या सौभाग्यवती वर्षानुवर्ष नगराध्यक्ष आहेत व त्यांचे भाचे सत्यजित तांबे हे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. असे स्वत: थोरात व त्यांचे हे तीन तांबे नातेवाईक या तालुक्याचे मंत्री व पदाधिकारी असताना अशा तालुक्यात पोलिसांवर मोठा हल्ला होतो व पोलिस तेथे गंभीररित्या जखमी होतात, ही शरमेची बाब आहे. त्यामुळे मंत्री थोरात व या तीन तांबे नातेवाईकांनी आपली नैतिक जबाबदारी समजून यांनी महाराष्ट्र पोलिसांची व जनतेची जाहीर माफी मागितली पाहिजे, अशी मागणी केली आहे तसेच शिव राष्ट्र सेना पक्ष हा पोलिस प्रशासनाच्या अहोरात्र पाठीशी राहील व झालेली घटना पुन्हा घडू नये व घडल्यास शिव राष्ट्र सेना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

तातडीने कारवाई करा- वर्मा

पोलिसांवर हल्ला करणार्‍या समाजकंटकांवर तातडीने कडक कारवाई करा, अशी मागणी जिल्हा सराफ सुवर्णकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष वर्मा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. जनरक्षणाचे कर्त्यव्य बजावणार्‍या पोलिसांवर संगमनेर येथे झालेला हल्ला हा समाजाच्या संरक्षक भिंतीवर झालेला हल्ला आहे. ही घटना अतिशय खेदजनक आहे. या घटनेचा जिल्ह्यातील सराफ सुवर्णकार संघटना तीव्र निषेध करत आहे. जिल्ह्यातील व्यापारी वर्ग पोलिस प्रशासनाच्यामागे ठामपणे उभा आहे. सध्याच्या करोना संकटकाळात पोलिस प्रशासनाला मदत करणे, हे सर्व जनतेचे कर्तव्य आहे. त्यामुळे पोलिसांवर हल्ला करणार्‍या समाजकंटकांवर तातडीने कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी वर्मा यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून व्यापारी वर्गाचा पोलिसांना पाठिंबा व्यक्त केला.

डॉ. सोनवणेंनी केला निषेध

संगमनेर येथे पोलिसांवर हल्ला झाला, तो अतिशय खेदजनक आहे आणि पोलिस कर्तव्य निभावत असताना पोलिस प्रशासनाला मदत करणे ही सर्वसामान्य जनतेची जबाबदारी असते. त्यामुळे पोलिसांवर हल्ला करणारे जे लोक आहेत, अशांवर कारवाई झाली पाहिजे. पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा दैनिक लोकमंथन व लोक न्यूज-24 च्यावतीने अशा समाजकंटकांचा जाहीर निषेध करतो, अशी प्रतिक्रिया मुख्य संपादक डॉ. अशोक सोनवणे यांनी व्यक्त केली. पोलिस हे माणूसच आहेत. पोलिसांच्या बाबतीमध्ये सर्वसामान्य जनतेने पोलिस प्रशासनाबरोबर राहिले पाहिजे. पोलिस हा रात्रंदिवस आपल्या संरक्षणासाठी जागता पहारा करत असतो. जर पोलिस नसते तर गुंडांनी आणि समाजकंटकांनी व बिनकायद्याच्या मंडळींनी सर्वसामान्य माणसाचे जीवन मुश्किल केले असते, त्यामुळे राजकीय लोकांनी मतांसाठी यात हस्तक्षेप न करता प्रशासनाला प्रशासनाचे काम करू द्यावे, असे आवाहनही डॉ. सोनवणे यांनी केले आहे.

COMMENTS