अहमदनगर/प्रतिनिधी- औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील सामूहिक बलात्कार घटनेतील आणि पारनेर (जि. नगर) येथील युवतीवर अत्याचार करून तिचा खून करण्याच्या घटने
अहमदनगर/प्रतिनिधी- औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील सामूहिक बलात्कार घटनेतील आणि पारनेर (जि. नगर) येथील युवतीवर अत्याचार करून तिचा खून करण्याच्या घटनेतील आरोपींना त्वरित अटक करण्यासाठी उचित उपयोजना करण्याचे आदेश उपसभापती डॉ.नीलम गोर्हे यांनी औरंगाबाद आणि नगर पोलीस प्रशासनाला दिले आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. मध्यरात्री पैठण तालुक्यातील तोंडीळी गावात दरोडेखोरांनी चोरीच्या उद्देशाने वस्तीवर हल्ला केला. त्यावेळी या नराधमांनी दोन महिलांवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोर्हे यांनी औरंगाबादचे पोलीस उपअधीक्षक विशाल नेहुल यांच्याशी संपर्क करून सविस्तर माहिती घेतली. तसेच या घटनेतील आरोपींना त्वरित अटक करण्यासाठी पथक तयार करावे. त्याचप्रमाणे याच परिसराच्या जवळच्या जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी अशाच घटना घडल्या होत्या, त्यामुळे दि.19 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री घडलेल्या घटनेचा त्यांच्याशी काही संबध आहे का, याचीदेखील माहिती घेण्याची सूचना डॉ.गोर्हे यांनी केली आहे. तसेच महिलांचे व त्या कुटुंबाचे समुपदेशन तात्काळ करावे असेही त्यांनी पोलिस प्रशासनाला आवर्जून सांगितले. या घटनेतील आरोपी पूर्वीच्या घटनेतील संबंधित आहेत का ? किंवा पूर्वीच्या कोणत्या घटनेतील आरोपी या घटनेत आहेत का?याचा देखील तपास घेण्याची सूचना डॉ.गोर्हे यांनी पोलिसांना केली आहे. यात पोलीस प्रशासन योग्य ती पावले उचलत असल्याचे नेहुल यांनी डॉ.गोर्हे यांना सांगितले. तसेच लवकरच आरोपीना अटक करण्यात येईल, असे देखील त्यांनी सांगितले. तसेच पारनेर (नगर) येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे. याबाबत देखील डॉ.गोर्हे यांनी नगर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना दूरध्वनीवरून संपर्क करून आरोपींना त्वरित अटक करण्याचे निर्देश दिले आहेत.
COMMENTS