Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये जबरदस्त वाढ करण्यात आली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज शनिवारी देखील सामान्य न

शिराळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध; राष्ट्रवादी-14 तर भाजप 4 राष्ट्रवादीची सत्ता कायम
म्हसवड शहरात दहा दिवसांतून एकदा पाणी; म्हसवड नगरपरिषदे विरोधात काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा
औंध येथील यमाई देवी तळे परिसर विकासाच्या कामास मुख्यमंत्र्यांची मान्यता

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये जबरदस्त वाढ करण्यात आली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज शनिवारी देखील सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लावली आहे. आजदेखील इंधनांच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये आज 30-35 पैसे प्रति लीटरची वाढ करण्यात आली आहे. यानंतर राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर प्रती लीटर 105.14 रुपये तर डिझेलचे भाव 93.87 रुपये झाले आहेत. याशिवाय मुंबईमध्ये आज पेट्रोल 34 पैशांनी वाढलं आहे. तर डिझेलचे भाव 37 पैशांनी वाढले आहेत.
दिल्ली – पेट्रोल 105.49 रुपये आणि डिझेल 94.22 रुपये प्रति लीटर
मुंबई – पेट्रोल 111.43 रुपये आणि डिझेल 102.15 रुपये प्रति लीटर
चेन्नई – पेट्रोल 102.70 रुपये आणि डिझेल 98.59 रुपये प्रति लीटर
कोलकाता – पेट्रोल 106.10 रुपये आणि डिझेल 97.33 रुपये प्रति लीटर

COMMENTS