पूरग्रस्त भागातील दौरे टाळा ; शरद पवारांचे राजकीय नेत्यांना आवाहन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पूरग्रस्त भागातील दौरे टाळा ; शरद पवारांचे राजकीय नेत्यांना आवाहन

मुंबई : राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि दरडी कोसळून झालेली परिस्थिती गंभीर आहे. अशावेळी राजकारण न करता मदत करण्याची गरज आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागाती

सांगली जिह्यातील दुधगावात पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप l LokNews24
पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटीचे पॅकेज : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पूरग्रस्त भागात मदत व बचाव कार्य वेगाने सुरु : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि दरडी कोसळून झालेली परिस्थिती गंभीर आहे. अशावेळी राजकारण न करता मदत करण्याची गरज आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागातील दौरे राजकीय नेत्यांनी टाळण्याची गरज आहे. कारण नेत्यांची दौरे केल्यास प्रशासकीय यंत्रणेवर ताण पडतो. आणि मदतीकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागातील दौरे टाळण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी राष्ट्रवादीकडून करण्यात येत असलेल्या मदतीची माहिती दिली.
यावेळी त्यांनी पूरग्रस्त भागात सुरू असलेल्या राजकीय नेत्यांच्या दौर्‍याबद्दलही भूमिका मांडली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर जबाबादारी आहे, पण इतर नेत्यांनी पूरग्रस्त भागातील दौरे टाळावेत, असं आवाहन पवार यांनी केलं. शरद पवार यांची आज मुंबईत पत्रकार परिषद झाली. यावेळी पवार यांनी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यातील पूरपरिस्थिती गंभीर असल्याचं सांगितलं. राज्याला पुराचा मोठा फटका बसला. पुरामुळे घरांचे व शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. राज्यात सात आठ जिल्यात पूरस्थिती आहे. कोकणात घरांचे नुकसान झाले. इतर ठिकाणी शेतीचं नुकसान झालंय. सहा जिल्ह्यांमध्ये अधिक नुकसान झालं आहे, असं पवार यांनी सांगितलं.
पूरग्रस्तांना राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे करण्यात येणार्‍या मदतीची माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर पूरग्रस्त भागात डॉक्टरांची पथके पाठवणार असल्याचेही ते म्हणाले. पुराचा फटका बसलेल्या 16 हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या कीट वाटल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पूरग्रस्त भागात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांनी दौरे केले. त्यांचे दौरे लोकांना धीर देण्यास उपयोगी पडतात. त्यामुळे या नेत्यांच्या दौर्‍यावर आमची हरकत नाही. पण, मला असे वाटतं की, ज्यांच्यावर जबाबदारी आहे, त्यांनी दौरे करून कामात सुसूत्रतेवर लक्ष दिले पाहिजे, असे पवार म्हणाले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दौर्‍याचं मी स्वागत करतो. कारण त्यांची ती जबाबदारी आहे. पण माझ्यासारखे नेते गेले, तर तिथल्या शासकीय यंत्रणेवर ताण पडतो. पुनर्वसनाच्या कामावरुन लक्ष विचलित होतं म्हणून मला असं वाटते की, माझ्यासारख्या इतर नेत्यांनी असे दौरे करणे टाळायला हवे, असे आवाहन पवार यांनी केले.

COMMENTS