पुलाच्या खर्चातील साडेतीनशे टक्के वाढीचा प्रस्ताव फेटाळला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुलाच्या खर्चातील साडेतीनशे टक्के वाढीचा प्रस्ताव फेटाळला

बोरिवली पश्‍चिमेतील एका उड्डाणपुलाच्या विस्तारित बांधकाम खर्चात तब्बल 350 टक्क्यांनी वाढ सुचविणारा महापालिका प्रशासनाचा प्रस्ताव स्थायी समितीने एकमताने फेटाळला.

मासुंदा तलावात आढळला महिलेचा मृतदेह
कडा कॉलनी परिसराला व येथील भूमीला पुण्यकर्माची ओढ
सातारा जिल्ह्यात निवडणूकीचे वारे; जिल्हा बँकेच्या निमित्ताने व्ह्यूरचनेस प्रारंभ

मुंबई/प्रतिनिधीः बोरिवली पश्‍चिमेतील एका उड्डाणपुलाच्या विस्तारित बांधकाम खर्चात तब्बल 350 टक्क्यांनी वाढ सुचविणारा महापालिका प्रशासनाचा प्रस्ताव स्थायी समितीने एकमताने फेटाळला. त्यामुळे हा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याची वेळ आली.आर. एम. भट्टड मार्ग-एस. व्ही. रोड जंक्शनसह कल्पना चावला चौक येथील उड्डाणपूल विस्तारासाठी महापालिकेने सुरुवातीस 161 कोटी रुपये मंजूर केले होते; मात्र हा खर्च 461 कोटी रुपयांपर्यंत वाढीव दाखविण्यात आला. खर्चवाढीच्या या प्रस्तावावरून मोठा वाद निर्माण झाला होता. अखेर या प्रस्तावास स्थायी समितीने एकमताने फेटाळला. 

एखाद्या योजनेसाठी 350 टक्के वाढीव खर्च दाखविण्याच्या प्रकारामुळे त्यावर प्रचंड गदारोळ होणार असल्याची अटकळ होती. त्यानुसार स्थायी समितीच्या बैठकीत सत्ताधारी शिवसेनेसह भाजप, काँग्रेस आणि इतर पक्षांनीही या खर्चवाढीस विरोध दर्शविला. महापालिकेने सादर केलेल्या प्रस्तावावर स्थायी समितीच्या सर्व सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानुसार हा प्रस्ताव फेटाळण्यात आल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले. महापालिकेने मांडलेल्या प्रस्तावात दाखविलेली 350 टक्क्यांची वाढ अत्यंत चुकीची आहे. त्यापेक्षा नवीन निविदा मागवून हा उड्डाणपूल बांधणे योग्य ठरेल, असे मत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी व्यक्त केले. एखाद्या प्रस्तावावर 10 टक्क्यांपर्यंत वाढीव खर्च समर्थनीय ठरू शकतो, असे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय मेहता यांनी गटनेत्यांच्या बैठकीत स्पष्ट केले होते. तसेच, काही वेळा परिस्थिती पाहून 30 ते 60 टक्क्यांपर्यंत वाढ मंजूर झाली आहे; परंतु 350 टक्क्यांची वाढ अयोग्य असल्याचे मत जाधव यांनी मांडले. या संदर्भात महापालिकेने धोरण मंजूर करावे, अशी सूचना त्यांनी केली. महापालिकेने सादर केलेला प्रस्ताव हा मनमानी कारभाराचा नमुना आहे. 350 टक्क्यांनी वाढीव खर्च दाखविणे हे आश्‍चर्यकारक आहे. स्थायी समितीने हा प्रस्ताव दप्तरी दाखल केला असला, तरीही प्रकल्प पूर्ण करायाला हवा, अशी प्रतिक्रिया भाजपचे स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी दिली.

COMMENTS