..पुन्हा असे केले तर ख़बरदार…; भाजपने दिला शिवसेनेला इशारा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

..पुन्हा असे केले तर ख़बरदार…; भाजपने दिला शिवसेनेला इशारा

अहमदनगर/प्रतिनिधी- केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे यांच्यावर ज्या पद्धतीने कारवाई केली, ती हुकूमशाहीची व मुस्काटदाबी करणारी आहे. नारायण राणे केंद्

गांधींबाबत बुध्दीभेदाचे प्रयत्न हाणून पाडा : निरंजन टकले 
मंजूर गावातून लाख रुपयेचा गांजा जप्त
रुग्णालयांसमोरील गर्दी आता पोलिसांचे टार्गेट ; विशेष पोलिस महानिरीक्षकांनी दिले उपाययोजनांचे आदेश

अहमदनगर/प्रतिनिधी- केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे यांच्यावर ज्या पद्धतीने कारवाई केली, ती हुकूमशाहीची व मुस्काटदाबी करणारी आहे. नारायण राणे केंद्रात मंत्री झाल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या पायाखाली वाळू सरकू लागली आहे. त्यातून आलेल्या नैराश्यातून अशी कृत्ये घडत आहे. या घटनेचा भाजप निषेध करीत असून, यापुढे अशा प्रकारचे कृत्य झाल्यास त्याच पद्धतीने त्याला उत्तर दिले जाईल व दडपशाहीच्या राजकारणास भाजप जसेच्या तसे उत्तर देईल, असा इशारा भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भय्या गंधे यांनी गुरुवारी दिला.
केंद्रीय मंत्री राणे यांच्या बेकायदेशीर अटकेच्या निषेधार्थ भाजपच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यात शहर जिल्हाध्यक्ष गंधे यांच्यासह ज्येष्ठ नेते वसंत लोढा, सुनील रामदासी, सचिन पारखी, महेश नामदे, बाळासाहेब गायकवाड, किशोर बोरा, तुषार पोटे, वसंत राठोड, अजय चितळे, महेश तवले, अनिल गट्टाणी, संतोष गांधी, विशाल खैरे, अमित गटणे आदी सहभागी झाले होते. निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना निवेदन देण्यात आले. यावेळी गंधे म्हणाले, एखाद्या केंद्रीय मंत्र्याला बेकायदेशीर अटक करुन दिलेली वागणूक ही महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात घडत आहे, ही दुर्दैवी घटना आहे. जर केंद्रीय मंत्र्याला अशी वागणूक मिळत असेल तर सर्वसामान्यांचे काय? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. राज्य सरकार आपले अपयश झाकण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करत आहे. राज्यात अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहे, परंतु शासन त्याकडे डोळेझाक करुन खरे बोलणार्‍यांवर गुन्हे दाखल करत आहेत. हे दडपशाहीचे राजकारण असून, त्यास भारतीय जनता पार्टी सडेतोड उत्तर देईल, असा इशाराही त्यांनी दिला. आपले मंत्री, आमदार, कार्यकर्ते यांच्याकडून सत्तेचा दुरोपयोग होत असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची तत्परता न दाखवता भाजपाच्या कार्यकर्त्यांवर विनाकरण गुन्हे दाखल केले जात आहे, असा आरोप शिवसेनेवर त्यांनी केला. यावेळी रामदासी म्हणाले, राडा संस्कृती ही भाजपाची नसून केंद्रीय मंत्र्यांना ज्या पद्धतीने अटक केली जाते, ती चुकीची असून, राज्य सरकार सत्तेचा दुरुपयोग करत आहे. भाजपचे वाढत्य प्राबल्य व जनतेचे मिळत असलेले पाठबळ यामुळे सरकार अस्वस्थ झाले आहे. राज्य सरकार जनतेचे प्रश्‍न सोडविण्यात पूर्णत: नाकाम ठरले असून, राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेमुळे व भाजपला मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे त्यांना अशाप्रकारे रोखण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. यावेळी सुमित बटुळे, शशांक कुलकर्णी, प्रशांत मुथा, सुजित खरमाळे, उमेश साठे, ऋग्वेद गंधे, लक्ष्मीकांत तिवारी, आशिष आनेचा, प्रणव सरनाईक उपस्थित होते.

ठाकरेंवर गुन्हा दाखल करा
जिल्हा पोलिस अधीक्षक यांना भाजपच्यावतीने निवेदन देण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई येथे झालेल्या दसरा मेळाव्यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांच्याविरोधात चिथावणीखोर व भडकावू भाषण केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

COMMENTS