पुणे जिल्ह्यात 42 टक्के लसीकरण पूर्ण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे जिल्ह्यात 42 टक्के लसीकरण पूर्ण

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये गेल्या पाच महिन्यांत 42 टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

800 Gram वजनाचं Baby जन्मलं, आणि …
लष्कर परिसरातील फॅशन स्ट्रीट भागात नागरिकावर गोळीबार| LokNews24
उमरखेड येथे शेतकऱ्याकडे धाडसी चोरी

पुणे/प्रतिनिधीः केंद्र सरकारच्या सूचनेनुसार पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये गेल्या पाच महिन्यांत 42 टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक नागरिकांचे लसीकरण किमान वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान यंत्रणांसमोर आहे. जिल्ह्यात सर्वाधिक 63 टक्के लसीकरण पुणे शहरात झाले असून, ग्रामीण भागांत अवघे 33 टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. 

पुणे शहर, पिंपरी चिंचवड तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात केंद्र सरकारच्या सूचनेनंतर 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 57 लाख 44 हजार 664 लाभार्थ्यांची नोंद झाली आहे. पैकी 24 लाखांहून अधिक जणांनी पहिला आणि सहा लाख 41 हजारांहून अधिक जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. म्हणजेच एकूण 30 लाख 42 हजार 320 जणांनी लस घेतली आहे. एकूण नोंदणीच्या तुलनेत सुमारे 27 लाखांहून अधिक जणांचे लसीकरण होणे बाकी आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. पुणे शहरात सर्वाधिक लसीकरणाची नोंद झाली असून, हे प्रमाण 63 टक्के आहे. ग्रामीण भागात 33 टक्के आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 34 टक्के लसीकरण झाले आहे. पहिला डोस घेतल्यानंतर दुसर्‍या डोससाठी 84 दिवसांच्या अंतराचा नियम केल्याने दुसरा डोस घेणार्‍यांची संख्या कमी झाली आहे. त्या उलट पहिला डोस घेणार्‍यांची संख्या अधिक आहे. आरोग्य कर्मचार्‍यांचे लसीकरण अपेक्षेपेक्षा जास्त झाले आहे. फ्रंटलाइन वर्कर्सच्या नोंदीखाली इतरांनीही सुरुवातीच्या टप्प्यात लसीकरण केल्याने ही संख्या वाढल्याचे दिसत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. साठीच्या पुढील ज्येष्ठांना पहिला डोस मिळाला असला, तरी दुसर्‍या डोससाठी अद्याप प्रतीक्षा करावी लागत आहे. 45 ते 59 या वयोगटातील सर्वांत कमी (नऊ टक्के) नागरिकांना दुसरा डोस आणि 49 टक्के जणांना पहिला डोस मिळाला आहे. राज्याच्या आरोग्य खात्याकडून पुणे शहर, जिल्हा ग्रामीण तसेच पिंपरी-चिंचवडमध्ये एकाचवेळी लसीचा पुरवठा होत आहे, तरीही ग्रामीण भागात लसींचा पुरवठा अपुरा होत असल्याची तक्रार करण्यात येत आहे. लोकसंख्येच्या तुलनेत लसींचा पुरवठा अन्य शहरांप्रमाणे सारखा करण्यात यावा. पुरवठा वाढविण्यात यावा, अशीही मागणी होत आहे.

COMMENTS