पुणे – खासगी, स्कूल बसना सरकारकडून परवानगी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे – खासगी, स्कूल बसना सरकारकडून परवानगी

पुणे : एसटी महामंडळाचे कर्मचारी आणि राज्य सरकारच्या वादात प्रवाशांना वेठीस धरण्यात येत असल्यामुळे राज्य सरकारने खासगी बस, शालेय विद्यार्थी वाहतूक करण

रंगलहरी दशकपुर्ती चित्र प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद
जि. प. – ग्रामविकास अधिकारी यांना विस्तार अधिकारी पदी पदोन्नती 
श्रीरामपुरात गांजासह 4 जण अटक, 1 फरार

पुणे : एसटी महामंडळाचे कर्मचारी आणि राज्य सरकारच्या वादात प्रवाशांना वेठीस धरण्यात येत असल्यामुळे राज्य सरकारने खासगी बस, शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यासाठी परवानगी दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटल्यावर त्यांना प्रवासी वाहतूक बंद करावी लागणार आहे.राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप तीव्र होऊ लागला आहे. त्यामुळे हजारो प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. अनेकांना कामावर परतण्यासाठीही अडचणी होत आहेत तर, अनेकजण गावांकडे अडकले आहेत. मालवाहतूक करणाऱ्या तसेच स्कूल बस आणि खासगी बसचालकांना प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे हजारो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. या बाबतचा आदेश प्रसिद्ध झाला. या आदेशामुळे प्रवासी वाहतुकीसाठी २५ हजारांपेक्षा जास्त वाहने उपलब्ध होणार आहेत.

COMMENTS