पालघरमध्ये फटाका कारखान्याला भीषण आग, 20-25 किमीपर्यंत बसले धक्के

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पालघरमध्ये फटाका कारखान्याला भीषण आग, 20-25 किमीपर्यंत बसले धक्के

पालघर जिल्ह्यातील डहाणूमधून फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला असून त्यामुळे प्रचंड आग लागली आहे. फायर वर्क्स असे या कंपनीचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे, ज्यात आग लागल्यामुळे खळबळ उडाली आहे. डहाणू महामार्गापासून 15 कि.मी. अंतरावर जंगलात हा कारखाना आहे. स्फोटानंतर आगी लागलेल्या आगीत 10 ते 12 कि.मी.पर्यंतच्या परिसरात असलेल्या घरांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. 

अभिनेत्री आर्चीने घेतलं ज्योतिबाचं दर्शन
महिलेच्या हत्येप्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा
पाकिस्तानची हतबलता

डहाणू : पालघर जिल्ह्यातील डहाणूमधून फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला असून त्यामुळे प्रचंड आग लागली आहे. फायर वर्क्स असे या कंपनीचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे, ज्यात आग लागल्यामुळे खळबळ उडाली आहे. डहाणू महामार्गापासून 15 कि.मी. अंतरावर जंगलात हा कारखाना आहे. स्फोटानंतर आगी लागलेल्या आगीत 10 ते 12 कि.मी.पर्यंतच्या परिसरात असलेल्या घरांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. 

तालुक्यातील डेहने पले येथील फटाका कंपनीत आज सकाळी आग लागून भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. स्फोटानंतर आगीने रौद्ररूप धारण केल्याने ज्वाळा २० ते २५ किमी वरूनही दिसत होत्या. डहाणू, तारापूर एमआयडीसी येथून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचं काम सुरू आहे. डहाणू तालुक्यातील डेहणे येथील विशाल फटाका कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. डहाणू चारोटी मुख्य हायवेपासून १५ किमी अंतरावर जंगल सदृश्य भागात ही कंपनी आहे. अचानक झालेल्या स्फोटाने आजूबाजूचा १५ते २० किलोमीटर अंतरावरील घरांना मोठे धक्के जाणवले आहेत. त्यामुळे हे धक्के भूकंपाचे असल्याचे सोशल मीडियावरून प्रसारित होत असताना काही वेळाने हे धक्के फटाक्याच्या आगीच्या स्फोटाचे असल्याचे कळले. नेमका हा स्फोट कशामुळे झाला आहे, याची माहिती अद्याप कळू शकली नाही. या घटनेत पोलीस सूत्रांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार चार ते ते पाच लोक गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे.

COMMENTS