कोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव तालुक्यातील करंजी गावातील चरमळ वस्ती या भागातील चिमुकल्याना वाहत्या पाण्यातून वाट काढत शाळेत यावे लागते असे
कोपरगाव शहर प्रतिनिधी-
कोपरगाव तालुक्यातील करंजी गावातील चरमळ वस्ती या भागातील चिमुकल्याना वाहत्या पाण्यातून वाट काढत शाळेत यावे लागते असे भयावह चित्र दिसून येत आहे. प्रत्येक पावसाळ्यात या वस्तीशाळेच्या विद्यार्थ्यांना ओढ्यातून अशी जीवघेणी पायपीट करत शाळेत जावे लागते. लवकरात लवकर या वस्तीला रस्ता करून देण्याची मागणी प्रशासनाला प्रहार पक्षाचे कार्याध्यक्ष संजय शिंदे यांनी केली आहे अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
यावेळी अधिक माहिती देतांना शिंदे यांनी सांगितले की, करंजी गावातील चरमळ वस्ती या वस्तीशाळा मध्ये इयता पहिली ते चौथी चे वर्ग आसुन सुमारे ५० पेक्षा अधिक कुटूंबातील चिमुकले या शाळेत शिक्षण घेत आहे.या वाहत्या ओढ्यातून या लहान मुलांना भर पावसात चिखलात पायपीट करावी लागते. कधी-कधी तर मुलाच्या मुलाच्या डोक्याइतके पाणी या ओढ्याला येते तेव्हा मुलांची शाळा बंद आठवडा-आठवडा बंद ठेवावी लागते. या वाहत्या पाण्याने भरलेल्या ओढ्यातून उद्याच्या भविष्याला घडवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे. मुलांना रस्त्या अभावी अतोनात हाल सोसावे लागत आहे.
करंजी ते अंदसुल असा हा पूर्वीचा रस्ता ओढ्याच्या बाजूने होता. ओढ्यावर दोन्ही बाजूने झालेले अतिक्रमण काढून चरमळ वस्ती शाळे पर्यत ४०० मिटर तरी हा रस्ता तातडीने बनवून या चिमुकल्याचे प्रत्येक पावसाळ्यात होणारे अतोनात हाल प्रशासनाने त्वरित थांबवावे अन्यथा प्रहार पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिंदे यांनी दिला आहे.
COMMENTS