पाच कोटीच्या खंडणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक

Homeमहाराष्ट्रसातारा

पाच कोटीच्या खंडणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक

लोणंद तसेच बारामती पोलीस ठाणेकडील पाच कोटीच्या खंडणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस तिरकवाडी, ता. फलटण येथून लोणंद पोलीस ठाण्याचे जेरबंद केले आहे.

ना.धनंजयजी मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्त रंगभरण स्पर्धा उत्साहात संपन्न
मुख्यमंत्र्यांमुळे नगरला मिळाला ऑक्सिजन
भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांचा आमदार काळेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश


लोणंद / वार्ताहर : लोणंद तसेच बारामती पोलीस ठाणेकडील पाच कोटीच्या खंडणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस तिरकवाडी, ता. फलटण येथून लोणंद पोलीस ठाण्याचे जेरबंद केले आहे.

दि. 05 फेबु्रवारी 21 रोजी सायंकाळच्या सुमारास डोंबाळवाडी, ता. फलटण गावच्या हद्दीतील सुळवस्तीवरील कॅनलच्या पुलावरुन अविनाश शामराव सोनवलकर रा. डोंबाळवाडी यांचे अपहरण करुन पाच कोटीची खंडणी आरोपींनी मागितली होती. त्यावरुन लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यातील अपहरण झालेल्या व्यक्तीची लोणंद पोलिसांनी त्याच दिवशी फलटण येथून संंशयित सुनिल लक्ष्मण दडस (रा. दुधेबावी, ता. फलटण) याच्या प्लॅटमधून सुटका केली होती. परंतू यातील आरोपी हे परागंदा झाले होते. तसेच आरोपींनी बारामती शहर पोलीस ठाणे हद्दीत अशाचप्रकारे पाच कोटी खंडणीकरीता एका इसमाचे अपहरण केले होते. यातील आरोपी हे गुन्हा घडल्यापासून फरार होते. आरोपींचे मागावर लोणंद पोलीस ठाणेच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची टिम होती. लोणंद पोलीस ठाण्याकडील खंडणीच्या गुन्ह्यातील फरार संशयित आरोपी प्रविण ऊर्फ सोन्या नवनाथ गुरव (रा. तिरकवाडी, ता. फलटण) व बारामती शहर पोलीस ठाणेकडील खंडणीच्या गुन्ह्यातील फरार संशयित आरोपी विशाल दिनकर नरवडे (रा. नर्‍हे, जि. पुणे) हे तिरकवाडी, ता. फलटण येथे असल्याची गोपनिय माहीती लोणंद पोलीस ठाण्याचे सपोनि विशाल वायकर यांना मिळाली होती. त्यानुसार तात्काळ पोउनि गणेश माने व गुन्हे प्रकटीकरण पथकाने तिरकवाडी, ता. फलटण येथे सापळा रचून शिताफिने दोन्ही फरार संशयितांना ताब्यात घेतले.

अजयकुमार बन्सल पोलीस अधिक्षक सातारा धीरज पाटील अप्पर पोलीस अधिक्षक सातारा, तानाजी बरडे उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विशाल वायकर, पोलीस उपनिरिक्षक गणेश माने, गुन्हेप्रकटीकरण पथकाचे पोलीस नाईक संतोष नाळे, पोलीस कॉस्टेबल श्रीनाथ कदम, अभिजित घनवट, सागर धेंडे यांनी कारवाईत भाग घेतला आहे.

COMMENTS