पाकिस्तान प्रतिनिधी- पाकिस्तानातील सिंध प्रांतात(Sindh Province in Pakistan) क्रूरतेचा कळस गाठणारी घटना उघडकीस आली आहे. पती-पत्नीतील घरगुती वादातून
पाकिस्तान प्रतिनिधी- पाकिस्तानातील सिंध प्रांतात(Sindh Province in Pakistan) क्रूरतेचा कळस गाठणारी घटना उघडकीस आली आहे. पती-पत्नीतील घरगुती वादातून एका व्यक्तीने पत्नीची हत्या करुन मृतदेह कढईत उकळल्याची अंगावर काटा आणणारी घटना कराचीत(In Karachi) घडली आहे. आधी महिलेच्या तोंडावर उशी दाबून तिची हत्या केली, मग 6 मुलांसमोर तिचा मृतदेह एका कढईत उकळला. यादरम्यान महिलेचा एक पाय शरीरापासून वेगळा झाला. सिंध पोलिसांना(Sindh Police) नर्गिस(Nargis) नावाच्या महिलेचा मृतदेह एका मोठ्या पातेल्यात सापडला. हा मृतदेह एका खासगी शाळेच्या स्वयंपाकघरात पडून होता. आरोपी तीन मुलांना घेऊन तेथून फरार झाला आहे. तर तीन मुलांना तेथेच सोडून दिले. आशिक(Aashiq) असे या आरोपीचे नाव असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

COMMENTS