पहिल्याच पावसांत मुंबईची तुंबापुरी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पहिल्याच पावसांत मुंबईची तुंबापुरी

मॉन्सून मुंबईत दाखल होताच पहिल्या पावसात मुंबईतील सखल परिसरात पाणी साचले आहे. मुंबईत पाणी तुंबल्याने विरोधकांनी महापालिकेच्या नालेसफाईवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहेत.

छत्रपती संभाजीराजे स्वराज्यरक्षक आणि धर्मवीरही होते
अंगणवाडी सेविकांनी मोबाईल केले जमा (Video)
राघव चड्ढा- परिणीती चोप्राने साखरपुडा उरकला ?

मुंबई/प्रतिनिधीः मॉन्सून मुंबईत दाखल होताच पहिल्या पावसात मुंबईतील सखल परिसरात पाणी साचले आहे. मुंबईत पाणी तुंबल्याने विरोधकांनी महापालिकेच्या नालेसफाईवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहेत. पहिल्याच पावसात मुंबई का तुंबली असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. यावर मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी उत्तर दिले आहे. मुंबईत आज सकाळपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली. मुंबईसह उपनगरातही पावसाने नागरिकांची दाणादाण उडवली आहे. अनेक सखल भागात पाणी साचले आहे. रेल्वे व रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. चहल आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी हिंदमाता परिसराची व तेथील परिस्थितीची पाहणी केली आहे. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमासोबत संवाद साधला.  

’मुंबईत आतापर्यंत 140 ते 160 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तसेच अवघ्या तासाभरात 60 मिलीमीटर पाऊस झाला आहे. साधारणपणे 24 तासांत 165 मिलीमीटर पाऊस झाला तर अतिवृष्टी होते. एकट्या सायन- दादरमध्ये 155 मिलीमीटर पाऊस झाला, म्हणून मुंबईत पाणी तुंबले, असे चहल यांनी स्पष्ट केले आहे. आपल्याकडे ड्रेनेजची क्षमता कमी असल्याने काही तासांसाठी मुंबईत पाणी तुंबणारच,’ असेही त्यांनी म्हटले आहे. ’हिंदमातामध्ये वर्षानुवर्ष वाहतुक कोंडी होत होती; मात्र या वेळी हिंदमाता परिसरात अडीच फुटापर्यंत पाणी साचूनही वाहतूक कोंडी झाली नाही. गेल्या दहा वर्षात पहिल्यांदाच वाहतूक कोंडी झाली नाही. आता साडेतीन फुटापर्यंत पाणी साचले, तरीही हिंदमातामध्ये वाहतूक कोंडी होणार नाही,’ असा विश्‍वास चहल यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत पाणी साचणार नाही, असा दावा आम्ही केलाच नव्हता; पण चार तासांच्या आत पाण्याचा निचरा झाला नाही तर मात्र विरोधकांचा आरोप योग्य आहे, असे पेडणेकर यांनी म्हटले होते. विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केले होते.

COMMENTS