पश्चिम बंगालमध्ये पुन्हा मोदी विरुद्ध ममतांचा सामना… मुख्यमंत्री ममता स्वतः निवडणुकीच्या रिंगणात

Homeताज्या बातम्यादेश

पश्चिम बंगालमध्ये पुन्हा मोदी विरुद्ध ममतांचा सामना… मुख्यमंत्री ममता स्वतः निवडणुकीच्या रिंगणात

वेब टीम : कोलकाताकाही महिन्यापूर्वी भाजपला तगडी टक्कर देत ममता बॅनर्जी यांनी पुन्हा पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन केली. मात्र, सुवेंदू अधिकारी यांनी

अखेर निवडक औषधांवरील आयात शुल्क रद्द
12 लाखांचं बक्षीस असलेल्या दोन खतरनाक नक्षलवाद्यांचं अखेर आत्मसमर्पण I LOKNews24
पोटच्या लेकीचा सौदा करणाऱ्या मातापित्यांचा ‘डाव’ ठाणे पोलिसांनी हाणून पाडला | LOKNews24

वेब टीम : कोलकाता
काही महिन्यापूर्वी भाजपला तगडी टक्कर देत ममता बॅनर्जी यांनी पुन्हा पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन केली. मात्र, सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राममधून पराभव केला.

ममता बॅनर्जी यांना सहा महिन्यात निवडून येणे आवश्यक आहे. त्यासाठी ममता बॅनर्जी भवानीपूर मतदारसंघाची निवड निश्चित केल्याचे सांगितले जात आहे. येथील विद्यमान आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी राजीनामा दिल्यामुळे निवडणूक आयोगाने या ठिकाणी पोटनिवडणुकीची तारीख जाहीर केली आहे.

ममता बॅनर्जी यांना मुख्यमंत्रीपदी कायम राहण्यासाठी सहा महिन्यात पुन्हा निवडून येणे महत्त्वाचे आहे. यासाठी त्यांनी भवानीपूर विधानसभा जागेची निवड केल्याचे बोलले जात होते.

यासाठी भवानीपूरमधील तृणमूल काँग्रेसचे आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी राजीनामा दिला आहे. या ठिकाणी निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक घोषित केले आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते काजल सिन्हा यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती.

निवडणूक निकालापूर्वी सिन्हा यांचे कोरोनामुळे निधन झाले. मात्र, जनतेने कौल दिल्यामुळे निवडणूक निकालात ते विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. आता खरदह येथील रिक्त जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. या जागेवर शोभनदेव चट्टोपाध्याय यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबरलाच पश्चिम बंगालच्या समसेरगंज, जंगीपूर आणि पिपली मध्येही पोटनिवडणूक होणार आहे. तसेच मतमोजणी ०३ ऑक्टोबर रोजी केली जाईल.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अन्य ३१ जागांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. घटनात्मक आवश्यकता आणि पश्चिम बंगालच्या विशेष विनंतीचा विचार करून, विधानसभा मतदारसंघ भवानीपूरसाठी पोटनिवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अत्यंत कठोर निकष लावले गेले आहेत, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

COMMENTS