Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलीस स्मृतिदिनानिमित्त पोलीस अधीक्षकांकडून श्रध्दांजली

सातारा / प्रतिनिधी : पोलीस स्मृतीदिनानिमित्त गेल्या वर्षभरात कर्तव्य बजावित असताना धारातीर्थी पडलेले देशभरातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना पोल

श्री स्वामी समर्थ महाराज चरित्र | Shri Swami Samarth Maharaj | LokNews24
किल्ले प्रतापगडावर शिवजयंती उत्साहात साजरी
निर्बंध घालून महाबळेश्‍वरसह पाचगणी परिसर पर्यटकांसाठी खुला

सातारा / प्रतिनिधी : पोलीस स्मृतीदिनानिमित्त गेल्या वर्षभरात कर्तव्य बजावित असताना धारातीर्थी पडलेले देशभरातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली वाहिली. पोलीस मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक अजित बोराडे यांच्यासह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल म्हणाले, 26/11 चा अतिरेकी हल्ला आठवल्यावर आजही आपल्या अंगावर शहारे उभे राहतात. सिमेवर काम करत असताना तेथे शत्रू कोण, मित्र कोण याची पूर्व कल्पना असते. परंतू अंतर्गत सुरक्षा करताना तेथे शत्रू कोण व मित्र कोण याची माहिती पोलिसांना नसते. कोणीही शुल्लक कारणावरुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करु शकतो. अंतर्गत सुरक्षा व्यवस्था सांभाळणार्‍या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची शहिद होण्याची संख्या वाढली आहे. पोलिसांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला असून त्याचा पोलिसांच्या आरोग्यावर परिणाम होवू लागला आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक नागरिकांनी पोलिसांना काम करताना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
समस्यांचा विचार न करता उपलब्ध मनुष्यबळाचा व साधनसामुग्रीचा पुरेपुर वापर करुन तसेच शहिद जवानांचा आदर्श आपल्या डोळ्यांसमोर ठेवून कार्यकर्तृत्वाचा ठसा समाजात उमटवून नि:पक्षपातीपणे काम करुन कायदा व सुरक्षेचा प्रश्‍न अबाधित राखवा. तसेच गोरगरीब, दीनदलित महिला व बालकांना तत्पर व योग्य न्याय देवून आपले कर्तव्य पार पाडावे, हीच खरी शहिदांना श्रध्दांजली ठरेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
गेल्या वर्षभरात कर्तव्यावर असताना शहिद झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या नावांचे वाचन करण्यात आले. यावेळी संपूर्ण पोलीस दलाने उभे राहून मानवंदना दिली. त्यानंतर पोलीस दलाने बंदूकीच्या तीन फैरी झाडून व पोलीस बिगुल वाद्य वाजवून स्मृतीस्तंभास मानवंदना दिली. पोलीस दलातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली वाहिली.

COMMENTS